शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातही आॅनलाईन खरेदीला आता मोठी पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 14:56 IST

लखमापूर : ग्रामीण भागात व शहरी भागात कोरोना मुळेसर्वच नागरिकांना बाहेर पडणे, जिकरीचे झाले आहे. त्यामुळे काही खरेदी करायचे असले तरी बंधने आली आहे. काही ठिकाणी दुकाने बंद तर काही ठिकाणी चालू ही स्थिती सध्या आहे. यावर पर्याय म्हणून जनतेने सर्व खरेदी आॅनलाईन पध्दतीने करट्याचा नवीन पवित्रा घेतला आहे.

ठळक मुद्देलखमापूर : कोरोनामुळे नागरिकांचा सावध पवित्रा

लखमापूर : ग्रामीण भागात व शहरी भागात कोरोना मुळेसर्वच नागरिकांना बाहेर पडणे, जिकरीचे झाले आहे. त्यामुळे काही खरेदी करायचे असले तरी बंधने आली आहे. काही ठिकाणी दुकाने बंद तर काही ठिकाणी चालू ही स्थिती सध्या आहे. यावर पर्याय म्हणून जनतेने सर्व खरेदी आॅनलाईन पध्दतीने करट्याचा नवीन पवित्रा घेतला आहे.प्रत्येक कुटुंबाला काही ना काही जीवनावश्यक वस्तूची खरेदी करणे गरजेचे असते. त्यासाठी कोणी खुल्या बाजाराला पसंती देतो, तर कोणी मॉलमध्ये जाऊन खरेदी करतात. परंतु आता मात्र कोरोनाचे वातावरण सगळीकडे मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे नागरिकांनी याला पर्याय म्हणून घरच्या घरी आॅनलाईन खरेदीला पसंती दिली आहे.बाजारपेठेत सध्या ग्राहक कमी जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. त्यामुळे दुकानदार लॉक डाऊनच्या नावाखाली वस्तूच्या किंमती जास्त वाढून देतात. परंतु ग्राहकांना गरज असल्यामुळे ती वस्तू जास्त भावाने खरेदी करावी लागते.परंतु आता मात्र ग्राहक वर्गाने या आर्थिक संकटातून सुटका मिळावी म्हणून आॅनलाईन अ‍ॅपव्दारे घरच्या घरी विविध वस्तू खरेदी करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे जास्त किंमत देऊन वस्तू खरेदी करण्यापेक्षा आता आॅनलाईन खरेदी ने खरेदी केल्यास विशेष सुट व घर पोच वस्तू मिळत असल्यामुळे ग्राहक खुश झालाआहे.आॅनलाईन खरेदीसाठी सध्या बरीच कंपन्यानी आपले चांगले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्याचा फायदा ग्राहक वर्गाला मिळत असल्यामुळे सुमारे ५० ते ६० टक्के नागरिकांनी आता आॅनलाईन खरेदीलाच पसंती दिली आहे.आॅनलाईनव्दारे ग्राहकांना घरगुती वस्तू, फर्नीचर, कपडे, बूट, घड्याळ, तसेच चैनीच्या अन् विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू, इ. आॅनलाईन खरेदी करता येत असल्यामुळे ग्राहक वर्ग घराच्या बाहेर न पडता व कोरोना पासून दुर राहाण्यासाठी मदत होत आहे.विविध कंपन्यानी दिलेल्या आॅनलाईन वस्तू खरेदी मुळे आम्ही आॅनलाईन वस्तू खरेदी करून घेत आहे. आमचा वेळ, पैसा आदींची आर्थिक हानी टळली असून घर बसल्या चांगल्या वस्तू मिळत असल्यामुळे आम्ही खुश आहे.- उमेश पगारे, आॅनलाईन, ग्राहक. (१६ लखमापूर)

टॅग्स :onlineऑनलाइनMarketबाजार