शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

आर.के.एम.मध्ये भरणार आॅनलाइन शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:01 IST

कळवण : दरवर्षी १५ जुनला शाळा सुरु होणार म्हणजे होणारच हे समीकरण यंदा कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने पूर्णपणे बदलले आहे. गेल्या महिना- दीड महिन्यापासून शाळा सुरु कराव्यात की नाही, यावरु न विविध स्तरावर चर्चा होत असतांना कळवणच्या आर. के. एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शाळा आता आॅनलाईनभरणार आहे.

कळवण : दरवर्षी १५ जुनला शाळा सुरु होणार म्हणजे होणारच हे समीकरण यंदा कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने पूर्णपणे बदलले आहे. गेल्या महिना- दीड महिन्यापासून शाळा सुरु कराव्यात की नाही, यावरु न विविध स्तरावर चर्चा होत असतांना कळवणच्या आर. के. एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शाळा आता आॅनलाईनभरणार आहे.शाळेच्या पहिल्याच दिवशी आर. के. एम. विद्यालयात शिक्षकांसाठी आॅनलाईन अभ्यास कार्यशाळा, निकालपत्रक तयार करणे, प्रवेशप्रक्रि या राबविणे, पटनोंदणी, पुस्तके वितरण व्यवस्था करणे या कार्यवाहीतून पहिला दिवस साजरा झाला. शिक्षण अखंड चालू राहावे, मुलांचा शैक्षणिक विकास कोरोनासारख्या महामारीच्या काळातही चालू राहावा या शुद्ध हेतूने सोमवारपासून आॅनलाईन शाळा सुरू करणार आहोत.भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता मार्च महिन्यापासूनच शिक्षकांना आॅनलाईन अध्ययन-अध्यापन प्रक्रि येचे ट्रेनिंग देण्यास सुरु वात झाली होती. विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेऊनच आॅनलाईन शाळेचे टाईमटेबल बनविण्यात आले.परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्र म मागे राहू नये, शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जिल्ह्यातसर्वंप्रथम तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करु न शिक्षकांनी व्हॉटस अ‍ॅप ग्रुप विकसित केले. त्यांच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचे प्रश्नसंच तयार करु न आॅनलाईन फीडबॅक घेत गृहपाठ घेतला गेला.शाळेच्या ३० वर्गातील२३०० विद्यार्थ्यांना प्रश्नसंच आॅनलाईन दिले. पाचवी ते नववी व ११ वीच्या सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट ,ईमेल ,जीमेलच्या माध्यमातून प्रत्येक वर्ग तुकडीसाठी वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास तयार करून विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर अपलोड केले.परिस्थितीचे गांभीर्य आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता आर. के. एम. शाळेने शासनाच्या आदेशाची वाट न पाहता नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व प्रथम आॅनलाइनस्टडी उपक्र म सुरू केला.याबद्दल भिन्नमतप्रवाह असले तरी हा अंतिम पर्याय नाही.सद्यस्थिती सुरळीत होईपर्यंत नाळ टिकवून ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी हितासाठी शाळेचा एक प्रयत्न आहे.- एल. डी. पगार, प्राचार्य आर. के. एम. विद्यालय--------------------------------नांदूरवैद्य शाळेत पुस्तके वाटपनांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाल्यापासून जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे शाळा पुन्हा कधी सुरू होणार यामुळे शिक्षण विभाग तसेच पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, सोमवारी (दि. १५) इगतपुरी तालुक्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुस्तकांचे वाटप मुख्याध्यापक नंदकिशोर बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करण्यात आली. इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या पालकांना मुख्याध्यापक नंदकिशोर बोराडे यांच्या हस्ते शिक्षिका वैशाली अहिरे, जितेंद्र नगराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. संदीप पवार, पाणीपुरवठा विभागाचे माधव कर्पे, प्रभाकर मुसळे, राणू मुसळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. गेल्या शैक्षणिक वर्षातील परीक्षाही झाल्या नाहीत. त्यात नव्याने शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबतचा ठाम निर्णय झाला नाही. तालुकानिहाय पाठ्यपुस्तके दाखल झाली आहेत. तेथून ती केंद्रनिहाय पोहोच केली. त्यानंतर काही ठिकाणी शाळास्तरावरही पोहोच झाली आहे.

------------------------------वैतरणानगर : वैतरणा परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत तसेच घरी जाऊन पुस्तकांचे वाटप केले. न्यू इंग्लिश स्कूल आहुर्ली येथेही पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक आर. एस. गायकवाड, रघुनाथ गायकर, दादाभाऊ गायकर, किसन गायकर, भाऊसाहेब बोराडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक