महिनाभरात ५८५ क्विंटल भाताची ऑनलाईन खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 05:12 PM2021-01-30T17:12:26+5:302021-01-30T17:14:32+5:30

त्र्यंबकेश्वर : शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याऐवजी केंद्र शासनाने सुरु केलेल्या आधारभूत खरेदी योजनेंतर्गत महिनाभरात (डिसेंबर ते जानेवारी) सुमारे ५८५ क्विंटल चांगल्या दर्जाचे भात ऑनलाईन खरेदी करण्यात आले. त्यामुळे अंतर्गत खरेदीने गोदामे फुल्ल झाली आहेत.

Online purchase of 585 quintals of paddy in a month | महिनाभरात ५८५ क्विंटल भाताची ऑनलाईन खरेदी

महिनाभरात ५८५ क्विंटल भाताची ऑनलाईन खरेदी

Next
ठळक मुद्दे त्र्यंबकेश्वर : आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत खरेदीने गोदाम फुल्ल

त्र्यंबकेश्वर : शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याऐवजी केंद्र शासनाने सुरु केलेल्या आधारभूत खरेदी योजनेंतर्गत महिनाभरात (डिसेंबर ते जानेवारी) सुमारे ५८५ क्विंटल चांगल्या दर्जाचे भात ऑनलाईन खरेदी करण्यात आले. त्यामुळे अंतर्गत खरेदीने गोदामे फुल्ल झाली आहेत.
मध्यंतरी अवकाळी पावसामुळे भाताचे नुकसान झाले. असे भात शासकीय गोदामात तर खरेदी केलेच नाही, पण व्यापाऱ्यांनीदेखील खरेदी केले नाही. गोदाम किपर यांना सक्त आदेश असल्याने ते हलक्या ग्रेडचे भात खरेदी करू शकत नव्हते. शासनाचे वरिष्ठांचे आदेश असल्याने गोदाम किपर भात खरेदी करू शकत नव्हते. मात्र, यात केंद्र सरकारने हमीभावाऐवजी आधारभूत भात एबीसी ग्रेड न लावता सर्व भात सरसकट चांगल्या दर्जाचे खरेदी केले. भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची गणना मोठ्या शेतकऱ्यांमध्ये करता येईल. त्यांचे खातेही मोठे व त्यांचे भातही ३० ते ४० पोत्यांहून जास्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर गोदामामध्ये सन २०१९ - २०२०मध्ये एकाधिकार धान्य खरेदीत भात खरेदी केले होते. ते अद्याप गोदामामध्येच असल्याने व सध्याचे ५९५.४५ क्विंटल भात मिळून १७४२ क्विंटल भात खरेदी होऊन गोदाम फुल्ल झाले आहे. अजून त्र्यंबककरांचे भात असले तरी येथे जागा नसल्याने आता तळेगाव अंजनेरी येथे ट्रॅक्टर टेम्पोने भात विक्रीसाठी न्यावे लागणार आहे. याबरोबरच तळेगाव अंजनेरी, खंबाळे, महिरावणी, वाढोली, अंजनेरी, जातेगाव, मुळेगाव आदी शिवारातील भात राहणारच आहे. पण उर्वरित त्र्यंबकचे भातही घ्यावे लागणार आहे.

Web Title: Online purchase of 585 quintals of paddy in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.