शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

येवलायेथेआॅनलाईन मुक्ती महोत्सव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:41 IST

येवला : कोरोना प्रार्दुभावाने सर्व मंदिर, धार्मिक स्थळे टाळे बंद झालेली आहेत. तर सण उत्सवांवरही बंधने आली आहेत. येथील मुक्तीभूमीवरील यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराची घोषणा ८५ वा वर्धापनदिन कार्यक्र मही यंदा रद्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आजदिलीजाणारमानवंदना

योगेंद्र वाघयेवला : कोरोना प्रार्दुभावाने सर्व मंदिर, धार्मिक स्थळे टाळे बंद झालेली आहेत. तर सण उत्सवांवरही बंधने आली आहेत. येथील मुक्तीभूमीवरील यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराची घोषणा ८५ वा वर्धापनदिन कार्यक्र मही यंदा रद्द करण्यात आला आहे. मात्र, आॅनलाईन मुक्ती महोत्सव सुरू असून मंगळवारी(दि.१३) शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मानवंदना दिली जाणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. १३ आॅक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाला मुक्तिभूमी म्हणून संबोधण्यात येते. दरवर्षी या दिवशी देशभरातून लाखो बौद्धबांधव मुक्तीभूमीवर वंदन करण्यासाठी येत असतात. या स्थळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श लाभल्यामुळे हे स्थान बौध्दबांधवांसाठी अतिमहत्वाचे तीर्थस्थळ बनलेले आहे.येवला मुक्तिभूमीचा विकास होत आहे. याठिकाणी विश्वभूषण स्तूप, भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेबांचे भव्य स्मारक निर्माण करण्यात आले आहे. पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे (बार्टीकडे) या स्मारकाची देखभाल व दुरु स्तीचे काम दिलेले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी सदर स्मारक परिसरात प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, वाचनालय, कर्मचारी निवासस्थान, संरक्षण भिंत, अ‍ॅम्पीथिएटर, लॅण्डस्केपिंग, अतिथीगृह इ. बांधकामांना प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे अंदाजपत्रके व आराखड्यावर सविस्तर प्रस्ताव सादर केलेला होता. सदर प्रस्ताव शासनाकडे मंजूरीसाठी प्रलंबित होता. राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी या कामांना प्रशासकीय मंजुरी तसेच १५ कोटी रु पये निधी मंजूर केला आहे. मात्र अद्याप सदर कामे सुरू झोलेली नाहीत.इनफो ...१)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुक्तीभूमीवरील १३ आॅक्टोबर निमित्त होणारे सर्व कार्यक्र म रद्द केले आहेत. मात्र मुक्तीभूभीवर विद्युत रोषणाई अन् सजावट केली असून शासकीय अधिकारी, कर्मचाºयांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण व मानवंदना दिली जाणार आहे. दरम्यान, मुक्तीभूमी परिसरात इतरांना प्रवेशास बंदीच असणार आहे.२) ऐतिहासिक धर्मांतर घोषणेचा ८५व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारपासून आॅनलाईन मुक्ती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात तीन दिवस व्याख्यानांचे आयोजन केले होते. मंगळवारी (दि.१३) दुपारी २ वा. आंबेडकरवादी गझल संमेलनाने महोत्सवाचा समारोप होणार आहे. 

टॅग्स :yevla-acयेवलाDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर