कळवण : कळवण तालुका विधी प्राधिकरण, कळवण वकील संघ, कळवण शिक्षण संस्था संचलित आर. के. एम. माध्यमिक विद्यालय कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेशीर शिबिराचे आयोजन डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन पार पडले. राष्ट्र उभारणीसाठी सुजाण, कर्तव्यनिष्ठ युवकांना मोठी कर्तव्ये पार पाडावी लागतील, असे प्रतिपादन कळवणच्या न्यायाधीश स्वरा पारखी यांनी यावेळी केले.शिबिरात सहन्यायाधीश अमृता जोशी उपस्थित होत्या. एकाच वेळी न्यायाधीशाचा कक्ष, वकील कक्ष व आर. के. एम. माध्यमिक विद्यालयाचा सेमिनार हॉल अशा ठिकाणाहून झालेल्या या ऑनलाईन कायदेशीर शिबिरात १५० युवकांनी सहभाग नोंदविला. यावेळी न्यायाधीश स्वरा पारखी यांनी उपक्रमाची सविस्तर माहिती देऊन युवकांच्या अनेक समस्यावर विचार मांडले. शिबिराला कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ शशिकांत पवार यांचे सहकार्य लाभले. यावेळी कळवण वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. नानासाहेब पगार, मुख्याध्यापक एल. डी. पगार, संगणक विशेषज्ज्ञ ज्ञानेश्वर पाटील, सुनील पाटोळे उपस्थित होते, न्यायालयातील संगणक विभागातील किरण साळी व निलेश घोलप यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सचे नियोजन केले. तर कार्यक्रमाचे संयोजन ॲड. मनोज सूर्यवंशी यांनी केले. ॲड. गणेश वळीणकर यांनी राष्ट्रीय युवा दिनाचे महत्त्व विशद केले.
ऑनलाईन कायदेशीर शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 00:49 IST
कळवण : कळवण तालुका विधी प्राधिकरण, कळवण वकील संघ, कळवण शिक्षण संस्था संचलित आर. के. एम. माध्यमिक विद्यालय कळवण ...
ऑनलाईन कायदेशीर शिबिर
ठळक मुद्दे कळवण : १५० युवकांचा सहभाग