शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बारावीसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 00:30 IST

नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लाकॅ डाऊन लागू केल्यानंतर राज्य सरकारनेही या निर्णयाची अंमलबजावणी केल्याने सध्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद असून, अशा स्थितीत विद्यार्थ्यांना पुढील वर्षाचे प्रवेश घेण्यासह कोणत्याही शैक्षणिक कामासाठी बाहेर पडणे शक्य नाही.

नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लाकॅ डाऊन लागू केल्यानंतर राज्य सरकारनेही या निर्णयाची अंमलबजावणी केल्याने सध्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद असून, अशा स्थितीत विद्यार्थ्यांना पुढील वर्षाचे प्रवेश घेण्यासह कोणत्याही शैक्षणिक कामासाठी बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिकमधील विविध महाविद्यालयांनी बारावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे.कोरोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर देशभरात २३ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातील मंडळ अथवा केंद्र स्तरावरील परीक्षा व निकालप्रक्रिया पूर्णपणे थांबविण्यात आली असून, पहिली ते आठवी आणि नववी व अकरावीचे निकालही विद्यार्थ्यांच्या वार्षिक सरासरी गुणांच्या आधारे जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे हे निकालही शाळा महाविद्यालयांनी आॅनलाइन पद्धतीने संस्थेच्या संकेतस्थाळावर प्रकाशित करून अथवा फोन, ई-मेल, एसएमएस व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमांतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले. परंतु, आता नवीन शैक्षणिक वर्ष तोंडावर येऊन ठेपले असतानाही शाळा महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शहरातील विविध शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांनी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्याची तयारी केली आहे. यात प्रामुख्याने बारावीच्या प्रवेशप्रक्रियेवर शैक्षणिक संस्थांचा भर असून, संस्थांच्या संकेतस्थळावरून आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.---------------------गोखले एज्युकेशन संस्थेच्या शहरी भागातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या प्रवेशप्रक्रिया दि. १० ते ३० जून २०२० या कालावधीत सकाळी १० वाजल्यापासून सर्व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. संस्थेच्या बी.वाय.के, एसएमआरके, एचपीटी व आरवायके महाविद्यालयांसह नाशिकरोड महाविद्यालय, डॉ. एम. एस. गोसावी कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज व एच.एल. कॉलेज, ओझर या महाविद्यालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार असणार आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात न येता प्रवेश घेता येण्यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे.- डॉ . मो. स. गोसावी, सचिव, गोखले एज्युकेशन सोसायटी

टॅग्स :Nashikनाशिक