शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कांदा पाच हजारांच्या पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 01:17 IST

बाजार समिती आवारावर कांद्याची आवक कमी होत असून, देशांतर्गत मागणी वाढलेली असल्यामुळे गेल्या सप्ताहापासून वाढत असलेले कांद्याचे दर गुरुवारीही वाढते राहिले. लासलगाव आणि वणीमध्ये कांदा दराने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

ठळक मुद्देभावातील तेजी कायम : अन्य बाजारपेठांमध्येही दर वाढले

नाशिक : बाजार समिती आवारावर कांद्याची आवक कमी होत असून, देशांतर्गत मागणी वाढलेली असल्यामुळे गेल्या सप्ताहापासून वाढत असलेले कांद्याचे दर गुरुवारीही वाढते राहिले. लासलगाव आणि वणीमध्ये कांदा दराने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे.वणी उपबाजारात गुरुवारी ५१११ रु पये प्रतिक्विंटल अशा विक्र मी दराने व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केला. बाजार समितीत ३०८ वाहनांमधून ७००० किलो कांदा विक्र ीसाठी आला होता. त्याला ५१११ रु पये कमाल ३८०० रु पये किमान, तर सरासरी ४४०० रु पये प्रतिक्विंटलचे दर मिळाले.आठवड्यापासून कांद्याच्या दरात होणारी वाढ उत्पादकांची कळी खुलविणारी असून, लाखो रु पयांची उलाढाल प्रतिदिनी होत आहे. केंद्र शासनाने काही दिवसांपूर्वी कांदा आयातीबाबत निर्णय घेतला होता. त्याबाबत उत्पादकांमध्ये नाराजीचे वातावरण होते; मात्र देशांतर्गत मागणी वाढल्याने कांदा पुरवठ्याला मर्यादा पडू लागल्याने बाजारात तेजीचे वातावरण आहे.पिंपळगावला कांद्याला ४८०० रुपयांचा भावपिंपळगाव बसवंत : येथील बाजार समितीत कांद्याच्या भावाने उच्चांकी धडक गाठली असून, कांदा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे कृषिमालाचे मोठे नुकसान झाले. त्यातून जो कांदा वाचला, त्याची विशेष काळजी उत्पादकांनी घेतल्याने त्याचा फायदा होताना दिसत आहे. सध्या कांद्याची आवक कमी झाली असून दर वधारले आहेत.गुरु वारी १५,२०० क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला कमीत कमी रु. २५०० सरासरी रु. ४४५१ तर जास्तीत जास्त ४८०० रु पयांचा भाव मिळाला. बुधवारच्या तुलनेने कांद्याचे भाव ९०० रु पयांनी तेजीत राहिले.कळवण, देवळा, सटाणा, वडाळी, धोडंबे व निफाड तालुक्यातील गावातून आणि परिसरातून कांदा विक्रीसाठी येत आहे. सध्याची कांद्याची स्थिती पाहता हे दर वाढतच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा