शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलमध्ये कांदा अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर : दादा भुसे  ​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 15:31 IST

वाजगाव येथे कृषी पर्यटन केंद्राचे उद्घाटन

संजय देवरेदेवळा (जि. नाशिक) : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यात कांदा अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातील, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. वाजगाव येथे एका कृषी पर्यटन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दिलीप बनकर होते. यावेळी मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र बापू पाटील, शंकरराव सावंत, जिल्हा बँकेचे माजी संचालक यशवंत आहिरे, मविप्रचे माजी संचालक डॉ. विश्राम निकम, अशोक पवार, के. एन. आहिरे, मालेगाव बाजार समितीचे माजी चेअरमन राजेंद्र जाधव, सतीश सुराणा, डॉ. यतीन कापडणीस आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्राच्या संचालिका अंजना केवळ देवरे व पद्मा बाळासाहेब देवरे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते फीत कापून व बैलजोडीचे पूजन करून कृषी पर्यटन केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. शेतकरी, विद्यार्थी आणि पर्यटक अशा सर्वच घटकांसाठी हे केंद्र लाभदायी असून, शेती आणि शिक्षण यांची सांगड यातून घातली जावी, अशी अपेक्षा ॲड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केली. आ. दिलीप बनकर यांनी ग्रामीण अर्थकारणाला बळ मिळण्यासाठी असे शेतीपूरक प्रयोग करण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. विश्राम निकम यांनी आभार मानले.कांदा नियोजनाबाबत समिती स्थापनशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेती करत असताना नवनवीन पर्याय शोधत व्यावसायिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यायला हवे. शेतकरी कुटुंबातील महिलांना सन्मान देत त्यांचेही नाव सातबाऱ्यावर यायला हवे. यामुळे योजनांचा लाभ घ्यायला सोपे जाते. कांदा या नगदी पिकावर शेतकऱ्यांचा जास्त भर असल्याने कांद्याबाबत दीर्घकालीन नियोजन व धोरण आखण्यासाठी शासनपातळीवर समिती गठित करण्यात आलेली असल्याची माहितीही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.