शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

नांदूरशिंगोटेत कांद्याची विक्रमी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:19 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे येथील उपबाजार आवारात महिनाभरात दुसऱ्यांदा कांद्याची विक्रमी आवक झाली होती. शुक्रवारी ...

ठळक मुद्देबाजार समिती । सरासरी दोन हजार रुपयांचा भाव

नांदूरशिंगोटे : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे येथील उपबाजार आवारात महिनाभरात दुसऱ्यांदा कांद्याची विक्रमी आवक झाली होती. शुक्रवारी (दि. २१) १३ हजार ४३० क्विंटल आवक होती. वर्षभराच्या तुलनेत येथे यावर्षी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. कांद्यास प्रतिक्विंटल सरासरी २००० हजार रुपयांच्या आसपास दर मिळाला.सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नांदूरशिंगोटे व दोडी येथे उपबाजार आवार आहे. नांदूरशिंगोटे येथे आठवड्यातून सोमवार व शुक्रवार तर दोडीला बुधवारी कांदा विक्री लिलाव असतो. गेल्या दोन महिन्यांपासून दोन्हीही ठिकाणी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती.येथील उपबाजारात कांदा विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना रोख स्वरूपात पेमेंट मिळत असल्याने शेतकºयांची येथे पसंती आहे. गेल्या महिन्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नांदूर उपबाजारात अकरा हजार क्विंटलची आवक झाली होती.बाजारभाव टिकून राहिल्याने शेतकºयांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. दोडी बुद्रुक उपबाजारात बुधवारी (दि. १९) आठ हजार आठशे नव्वद क्विंंटल आवक होती. कांद्यास सरासरी २००० हजार, जास्तीत जास्त २६५१ व कमीत कमी २०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याचीमाहिती बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, उपसभापती सुधाकर शिंदे, सचिव विजय विखे, उपसचिव पी. आर. जाधव यांनी दिली.गेल्या पंधरा दिवसांपासून नांदूरशिंगोटे व दोडी येथे कांदा लिलाव दुपारी ४ वाजता सुरू होत असल्याने लिलाव सुरळीत पार पडत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना लवकर घरी जाण्यास मिळत आहे. आज येथे २४ हजार ३९५ च्या आसपास कांदा गोणी म्हणजे १३ हजार ४३० क्विंटल आवक होती.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा