शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे दर गृहिणींच्या आवाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 23:30 IST

नाशिक : घाऊक बाजारात कांद्याच्या दरात दररोज चढउतार होत असली तरी किरकोळ बाजारात मात्र कांद्याच्या प्रतिनुसार ग्राहकांकडून दर आकारले जात असले तरी सध्या कांदा खरेदी गृहिणींच्या आवाक्यात आली आहे. दरम्यान, हायब्रीड कोथिंबिरीला गुजराथमध्ये मागणी वाढल्याने कोथिंबिरीच्या दरात वाढ झाली असून, गत सप्ताहाच्या तुलनेत फ्लॉवरच्या दरामध्ये सुधारणा झाली आहे. कोबी उत्पादक शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल दराने माल विक्री करावी लागत आहे.

ठळक मुद्देकोथिंबीरची मागणी वाढली । फ्लॉवरच्या दरात सुधारणा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : घाऊक बाजारात कांद्याच्या दरात दररोज चढउतार होत असली तरी किरकोळ बाजारात मात्र कांद्याच्या प्रतिनुसार ग्राहकांकडून दर आकारले जात असले तरी सध्या कांदा खरेदी गृहिणींच्या आवाक्यात आली आहे. दरम्यान, हायब्रीड कोथिंबिरीला गुजराथमध्ये मागणी वाढल्याने कोथिंबिरीच्या दरात वाढ झाली असून, गत सप्ताहाच्या तुलनेत फ्लॉवरच्या दरामध्ये सुधारणा झाली आहे. कोबी उत्पादक शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल दराने माल विक्री करावी लागत आहे.मागील काही सप्ताहापासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहेत. किरकोळ बाजारातही कांदा दरात थोड्याफार प्रमाणात घसरण झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात ३० ते १२ रुपये किलोप्रमाणे कांदा विक्री होत आहे. कांद्याची प्रत पाहून ग्राहक खरेदी करताना दिसतात.कोबी फ्लॉवरच्या दर मागील सप्ताहात खूपच घसरण झाली होती. कोबीच्या भावात अद्याप काही सुधारणा झाली नसली तरी फ्लॉवरच्या दरात थोड्याफार प्रमाणात सुधारणा झाली आहे. सध्या फ्लॉवर ५०० ते १००० रुपये क्ंिवटल, तर कोबी ३०० ते ५५० रुपये क्विंटलने विकला जात आहे. किरकोळ बाजारात फ्लॉवर १० ते २० रुपये नगाप्रमाणे विकला जात आहे. फळभाज्यांमध्ये काकडी, कारले यांना चांगली मागणी आहे. काकडीला ८०० ते २००० रुपये क्विंटल, तर कारल्याला २००० ते ३७५० रुपये क्विंटल दर मिळत आहे. टमाट्याची आवक आणि भाव स्थिर आहेत. टमाट्याला ३०० ते ७०० रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. महाराष्टÑात शेकड्याने विकली जाणारी कोथिंबीर गुजराथमध्ये किलोने विकली जाते. सध्या गुजराथमधून हायब्रीड कोथिंबीरला चांगली मागणी आहे. यामुळे नाशिक बाजार समितीत कोथिंबीरच्या दरात सुधारणा झाली असून, सध्या ही कोथिंबीर १८०० ते ४२०० रुपये शेकडा या दराने विकली जात आहे. महाराष्टÑात गावठी कोथिंबीरला मागणी असली तरी गावठी कोथिंबीरची आवक कमी झाल्याने सध्या या कोथिंबीरलाही चांगला दर मिळत आहे.

टॅग्स :Marketबाजारonionकांदा