शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा दरात घसरण सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:53 IST

ब्राह्मणगाव - कोरोनाच्या संकटात शेतीत दोन हात करत पिकवलेल्या कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी चिंतीत झाले आहेत. कांद्याचे दर ६०० ते ६५० रुपयांपर्यंत आल्याने बळीराजा हवालदील झाला आहे.

ठळक मुद्देचिंता : भांडवल नसल्याने बळीराजा हवालदील

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणगाव - कोरोनाच्या संकटात शेतीत दोन हात करत पिकवलेल्या कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी चिंतीत झाले आहेत. कांद्याचे दर ६०० ते ६५० रुपयांपर्यंत आल्याने बळीराजा हवालदील झाला आहे.खरिपाची तयारी करतांना शेतकऱ्यांना सद्या आर्थिक अडचण पाहता शेतकऱ्यांकडे सद्या विक्र ीसाठी चाळीत साठवलेला कांदा हे एकमेव साधन आहे. त्यात दोन पैसे जास्त भेटले तर खरीप हंगाम साठी भांडवल उपलब्ध होईल.मात्र शेतकºयांनी बाजारात विक्र ीसाठी नेलेला कांदा अगदीच कमी भावात विकावा लागत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.सद्या शेतकºयांना बँकांनीही कर्ज देण्यास हात आखडता घेतला आहे.जिल्हा बँकेची परिस्थिती, सहकारी संस्था यांची परिस्थिती बिकट आहे तर राष्ट्रीय कृत बँक शेती कर्ज देण्यास नकार देतात. तेव्हा शेतकºयांना आर्थिक भांडवलाची आवश्यकता पाहता सद्या तरी कांदा हे हमी पीक आहे. मात्र हेच हातचे साधन मातीमोल भावाने विकून हाती येणाºया पैशात शेतात बी बियाणे,खते, व अन्य व्यवस्था कशी करावी या विवचनेत शेतकरी सापडला आहे. शासनाने यात हस्तक्षेप करून कांद्याला चांगला भाव मिळेल अशी व्यवस्था करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. त्यातच एवढी महागडी औषधे, बियाणे, खते, डिझेलचे वाढते भाव पेरणी करून ही पावसाने परिसरात घेतलेली विश्रांती पाहता पीक व उत्पन्न हाती कसे येईल या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.कोरोनाचा फटका गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच कांद्याचीही मागणी घटली तसेच बाजारभावही कमी झाल्याने शेतकरी चिंंतीत आहे.

टॅग्स :Marketबाजारonionकांदा