शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

निर्यातबंदी उठविल्यानंतर कांदा दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 00:11 IST

नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी येत्या १ जानेवारी, २०२१ पासून हटविण्याचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या निर्णयानंतर लासलगाव बाजार समितीत लाल कांदा दरात सहाशे रुपयांनी, तर उन्हाळ कांदा दरात सुमारे तीनशे रुपयांनी वाढ झाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान, शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यापुढील काळात कांद्याला चांगला दर मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देनाशिक जिल्हा : लाल कांदा दरात सहाशे रुपयांची वृद्धी

नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी येत्या १ जानेवारी, २०२१ पासून हटविण्याचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या निर्णयानंतर लासलगाव बाजार समितीत लाल कांदा दरात सहाशे रुपयांनी, तर उन्हाळ कांदा दरात सुमारे तीनशे रुपयांनी वाढ झाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान, शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यापुढील काळात कांद्याला चांगला दर मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.केंद्र सरकारने सप्टेंबर, २०२० मध्ये कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातबंदी घोषित केली होती. त्यानंतर, या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटत शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनाची भूमिका घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात होत असलेली घसरण लक्षात घेता, शेतकऱ्यांनी कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी जोर लावला होता. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने येत्या १ जानेवारी, २०२१ पासून कांदा निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे तत्काळ परिणाम दिसून येणार नसले, तरी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मंगळवारी (दि. २९) लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावाप्रसंगी दरात तेजी बघायला मिळाली. लाल कांदा दरात सहाशे रुपयांची वाढ झाली. लासलगांव बाजार समितीच्या पहिल्या सत्रात उन्हाळ कांदा दर किमान ८०१ ते कमाल १,९८१ व सरासरी १,५०० रुपये तर लाल कांदा किमान १,००० ते कमाल २,६६८ रुपये व सरासरी २,४०० रुपये बाजारभाव राहिले. सोमवारी (दि.२८) याच समितीत साठ वाहनांतील ६६४ क्विंटल उन्हाळ कांद्याचा दर ५०० ते १,६८० व सरासरी १,४०० रुपये होता, तर १,१४७ वाहनांतील १४ हजार ७१० क्विंटल लाल कांद्याचा दर १,२०० ते २,०७२ व सरासरी १,९५१ रुपये होता.पिंपळगावी दर जैसे थेपिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी उन्हाळ कांद्याला जास्तीतजास्त २,६०० तर लाल कांद्याला २,८८१ रुपये दर मिळाला. कांदा निर्यात उठविण्याच्या घोषणेचा अद्याप काहीही परिणाम दरावर जाणवला नाही. पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची ३० ट्रॅक्टर व २० वाहनातून तर लाल कांद्याची ६९८ वाहनातून आवक झाली. उन्हाळ कांद्यास जास्तीतजास्त २,६००, कमीतकमी १,४०० सरासरी २,३२५ दर मिळाला, तर लाल कांद्यास जास्तीतजास्त २,८८१, कमीतकमी १,५०० सरासरी २,२५१ बाजारभाव मिळाला. गेल्या कित्येक दिवसांपासून कांदा दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. निर्यात खुली करण्याचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादकांना दरवाढीकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा