शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या महिलांच्या गळ्यात कांद्याची माळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 01:27 IST

नासिक : शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने गळ्यात कांद्याच्या माळा घालून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून निर्यात बंदी मागे घ्यावी म्हणून आंदोलन केले.

ठळक मुद्देनिर्यात बंदीला विरोध: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नासिक : शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने गळ्यात कांद्याच्या माळा घालून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून निर्यात बंदी मागे घ्यावी म्हणून आंदोलन केले.केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी केल्याने *राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, त्यात म्हटले आहे की, ४ जून रोजी केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदा हे पिक वगळले होते. मात्र तीन महिन्यातच कांद्यावर पुन्हा निर्यात बंदी घालून शेतकर्यांचा विश्वासघात केला आहे. लॉकडाऊन च्या अतिशय संकट काळात मोठ्या कष्टाने शेतकर्याने कांदा पिकवला होता. दोन तीन दिवसापासून कांद्याला चांगला भाव मिळायला लागला होता. तेवढ्यात केंद्र सरकारने कांद्यावर पुन्हा निर्यातबंदी घोषित केली यामुळे शेतकरी देशोधडीला लागेल. कोरोना रोगा सारख्या महाभयंकर संकटात स्वता:च्या आणि कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्याने लोकांसाठी भाजीपाला पिकवून शहरातील नागरिकांना अन्न धान्यांची सोय उपलब्ध करून दिली.शेतकर्याने पिकवलेला कांद्याला दोन दिवसापासून चांगला भाव मिळायला लागला तेवढ्यात कांद्यावर निर्यात बंदी घालून बळीराजाच्या तोंडातला घास केंद्र सरकारने हिरावून घेतला त्यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी पसरली आहे. त्यामुळे भविष्यात यामुळे शेतकरी आत्महत्या वाढतील. तेव्हा केंद्र सरकारने तत्काळ निर्णय घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी मागे घ्यावी. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालया मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन दिले. निवेदन देतांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे शहराध्यक्षा अनिता भामरे, कार्याध्यक्ष सुषमा पगारे, पश्चिम विधानसभा अध्यक्ष पुष्पा राठोड, विभागीय अध्यक्ष रूपाली पठारे, अपेक्षा अहिरे, शहर पदाधिकारी मिनाक्षी गायकवाड, मंगला मोरे, लता चौधरी, सुजाता गाढवे, भारती चित्ते आदि महिला उपस्थित होत्या. (फोटो ल्ल२‘ वर राष्ट्रवादी)

 

टॅग्स :onionकांदाPoliticsराजकारण