शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कांदाप्रश्नी पंतप्रधानांना लिहिणार १ लाख पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:54 IST

नाशिक : राज्यात कधी नव्हे इतका कांद्याच्या बाजारभावाचा पेच निर्माण झाला आहे. आज कांद्याचे सरासरी दर अगदी ४ रुपये किलो इतक्या खाली आल्याने कांदा उत्पादकांना नफा तर दूरच उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे.

नाशिक : राज्यात कधी नव्हे इतका कांद्याच्या बाजारभावाचा पेच निर्माण झाला आहे. आज कांद्याचे सरासरी दर अगदी ४ रुपये किलो इतक्या खाली आल्याने कांदा उत्पादकांना नफा तर दूरच उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे.कांदा उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत असताना सरकार मात्र काहीच हालचाल करताना दिसत नाही. कांदा बाजारभावाची झालेली घसरण थांबविण्यासाठी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्र पाठवणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली. राज्यभरातून सुमारे एक लाख लेखी पत्र या मोहिमेतून पाठविण्यात येतील.शुक्रवारपासून (दि.२२) या मोहिमेला सुरुवात होणार आहे. राज्यातील एक लाख शेतकरी स्वत: हे पत्र लिहून त्या त्या गावातील टपाल कार्यालयात पोहच करतील. २२ ते २८ मे या ८ दिवसात ही एक लाख पत्रं पाठवली जाणार आहेत.केंद्र सरकारने कांद्याला नुकतेच जीवनावश्यक वस्तूंच्या सूचीतून बाहेर काढण्याची घोषणा केली आहे. परंतु कांदा भावातील घसरण थांबण्यास तयार नाही.आधी अतिवृष्टी नंतर निर्यातबंदी व आता कोरोना महामारीमुळे एकामागून एका लॉकडाउनमुळे कांद्याचे भाव सतत कमी होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.----------------------------------------कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत असतानाही सरकार मात्र कांदा प्रश्नावर काहीही उपाययोजना करताना दिसत नाही.केंद्र सरकारने २० रुपये प्रतिकिलो या भावाने थेट शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी करावी ही मागणी प्रामुख्याने यावेळी या लेखी पत्रातून करण्यात येणार आहे.पावसाळा सुरू होण्यास आता फक्त दोनच आठवडे शिल्लक असल्याने शेतात काढून पडलेला लाखो टन कांदा सडण्यापूर्वी केंद्र सरकारने तात्काळ शेतकºयांच्या कांद्याची खरेदी करावी व कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत देशातील शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकºयांना न्याय द्यावा यासाठी नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे, सातारा, उस्मानाबाद, बीड, परभणी, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, धुळे, औरंगाबादसह राज्यभरातील कांदा उत्पादक या पत्र मोहिमेत सहभाग घेतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक