शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

शेकडो हेक्टरवरील कांदा करपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 01:42 IST

पाटोदा : येवला तालुक्याला यावर्षी भयाण दुष्काळाचे चटके बसत आहेत. दुष्काळी स्थितीचा सर्वात जास्त फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

ठळक मुद्देदुष्काळाचा फटका : एकरी साठ हजार रु पये खर्च वाया; शेतकरी आर्थिक संकटात

गोरख घुसळे।पाटोदा : येवला तालुक्याला यावर्षी भयाण दुष्काळाचे चटके बसत आहेत. दुष्काळी स्थितीचा सर्वात जास्त फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.कांदा हे नगदी पीक असल्याने कांदा लागवडीकडे तालुक्यातील शेतकºयांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावर्षी पावसाळ्याच्या चारही महिन्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकºयांनी पावसाच्या भरवश्यावर लागवड केलेला हजारो हेक्टरवरील कांदा पाण्याअभावी जळून खाक झाला आहे. कांदा लागवडीसाठी एकरी सुमारे साठ हजार रुपये खर्च केलेला पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. ज्या शेतकºयांकडे थोडेफार पाणी उपलब्ध आहे अशा शेतकºयांनी कांदा पीक जागविण्यासाठी जिवाचा आटापिटा सुरू केला आहे. मात्र वीजपुरवठा हा कमी-अधिक प्रमाणात होत असल्याने उर्वरित पीकही पाण्याअभावी संकटात सापडले असून, शेतकरी चिंतित आहे.कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या येवला तालुक्याला दरवर्षीच दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी कमी कमी होत असलेल्या पर्जन्यामुळे शेतीव्यवसाय धोक्यात आला आहे. असे असले तरी शेतकरी नगदी पीक म्हणून कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करीत आहेत.कांदा लागवडीसाठी एकरी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो. पावसाच्या दगाफटक्याने सर्वच जलस्र्रोत कोरडेठाक पडले आहेत. विहिरींना तसेच विंधनविहिरींनादेखील पाणी उतरले नाही. शेतकºयांनी रिमझिम पावसावर कांदा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. आज ना उद्या पाऊस पडेल व विहिरींना पाणी येईल, अशी शेतकरीवर्गाला आशा होती; मात्र पावसाळ्याच्या पूर्ण हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने लागवड केलेला कांदा शेतात पूर्णपणे करपून गेला आहे. कमी पर्जन्यामुळे भूजलपातळी कमालीची खाली गेली आहे. शेकडो फूट खोल विंधनविहिरी घेऊनही पाणी उपलब्ध न झाल्याने कांदा पिकाची वाताहत झाली आहे.कांद्याचे ९५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रयेवला तालुक्यात शेतकरीवर्गाने हजारो हेक्टर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड केली. मात्र ९५ टक्क्यांपेक्षा जास्त कांदाक्षेत्र पाण्याअभावी करपून गेले आहे. कांदा लागवडीसाठी शेतकºयांनी एकरी सरासरी साठ हजारांपेक्षा जास्त खर्च केला आहे. मात्र लागवड केलेला कांदा करपून गेल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. तेलही गेले अन् तूपही गेले अशी शेतकºयांची अवस्था झाली आहे.तालुक्यातील शेतकºयांनी पोटच्या मुलाबाळाप्रमाणे कांदा पीक जगविण्यासाठी धावपळ केली मात्र त्यांना यश आले नाही. पावसाळ्यातही पिके जगतील अशा स्वरूपाचा पाऊस न झाल्याने संपूर्ण कांदा पीक उद्ध्वस्त झाले. शासनाने जनरेट्यामुळे उशिरा का होईना येवला तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. शासनाने कांदा पिकाचे पंचनामे करून शेतकºयांना भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.