शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यात प्रोत्साहन अनुदान शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 01:55 IST

केंद्र सरकारने कांद्यासाठीचा निर्यात प्रोत्साहन दर शून्य टक्के केल्याने त्याचा परिणाम निर्यातीवर होऊन कांदा दरात घसरण होण्याची शक्यता आहे. या निर्णयाबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

लासलगाव : केंद्र सरकारने कांद्यासाठीचा निर्यात प्रोत्साहन दर शून्य टक्के केल्याने त्याचा परिणाम निर्यातीवर होऊन कांदा दरात घसरण होण्याची शक्यता आहे. या निर्णयाबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान, कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेस आणखी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केली आहे.भारतातून व्यापारी वस्तूंच्या निर्यातीसंबंधी असलेल्या एमईआयएस योजनेंतर्गत पाठविण्यात येणाºया कांद्यास १० टक्के एमईआयएस दर लागू राहील,असे केंद्र शासनाने दि. २८ डिसेंबर २०१८ रोजी जाहीर केले होते. त्यानुसार सदरची योजना दि. ३० जून २०१९ पर्यंत सुरू ठेवण्यात येणार होती. मात्र मंगळवारी (दि. ११) अचानकपणे केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभागाच्या विदेश व्यापार महानिदेशालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार सदरचा दर शून्य टक्के केल्याने त्याचा परिणाम कांदा निर्यातीवर होऊन पर्यायाने कांदा दरात पुन्हा एकदा घसरण होण्याची शक्यता आहे.सध्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांद्याची आवक होत असून एकट्या लासलगाव बाजार समितीत दररोज साधारणत: २० ते २५ हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. सदर कांदा कमीत कमी ७०० रुपये व जास्तीत जास्त १४३२ रुपये व सर्वसाधारण ११५० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. मात्र गेल्या १० ते १५ दिवसांपासून कांदा बाजारभावात सुधारणा झाल्यामुळे शेतकरी बांधवांना दोन पैसे मिळण्याची संधी असतांना योजनेचा दर शून्य टक्के केल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा