शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कांद्यानेही नाही दिली साथ; बळीराजाचा डोक्याला हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:08 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बळीराजांच्या समोरील समस्या कायम असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा पिकास हमीभाव मिळत नसल्याने व उत्पादन खर्चही सुटत नसल्याने कांदा उत्पादकांसमोर उदरनिर्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बळीराजांच्या समोरील समस्या कायम असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा पिकास हमीभाव मिळत नसल्याने व उत्पादन खर्चही सुटत नसल्याने कांदा उत्पादकांसमोर उदरनिर्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे शासनाने तत्काळ उपाययोजना करुन शेतकरी वर्गाला दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.कोरोनाच्या साथीच्या सर्वत्र थैमान घातल्याने शेतकर्यांनाही त्याचा फटका बसत आहे. द्राक्षे, टमाटा, कोथिंबीर तसेच अन्य फळे व भाजीपाल्यास भाव मिळत नसल्याने काय पिकवावे असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. त्यातच मोठ्या कष्टाने कांदा पिकविला. कर्ज घेऊन कांदा पीक घेतले. कांदा पिकाला आता चांगला भाव मिळेल व कोरोनामध्ये आपला वाया गेलेला खर्च भरून निघले या आशेवर बळीराजा होता.परंतु जेव्हा शेतकरी वर्गाने आपला कांदा बाजारपेठेत आणला तेव्हा मात्र एक हजारांच्या आतच भाव मिळाल्याने अपेक्षांवर पाणी फेरले गेले. शेतकरी आपल्या शेतात जो शेती माल पिकवितो तो काही तरी आशा घेऊनच. पंरतु काही निवडक काळ जर सोडला तर बळीराजांची एकही मनात निर्माण केलेली आशा पूर्ण झालेली नाही. प्रत्येक पिकविलेल्या पिकांला योग्य भाव न मिळाल्याने व कांदा पिकांला भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल होऊन खरीप हंगाम तोंडावर आल्याने भांडवल कसे उभे करायचे या चिंतेत सापडला आहे. मदतीला कोण देवदूत धावून येणार याकडे शेतकरी वर्गाच्या नजरा लागून राहिल्या आहेत.------------------दिवसेंदिवस त्यांचे व्याज वाढतचं आहे. आता हे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवेचनेत बळीराजा सापडला आहे. दिवसेंदिवस शेतकरी वर्ग समास्याच्या विळख्यात सापडला जात असून आता आपला संसार कसा चालवावा व पोट कसे भरायचे असा सवाल निर्माण झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक