शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून कांदा लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 01:54 IST

पिंपळगाव बसवंत : कांद्याने पाच हजार रु पयांचा टप्पा ओलांडताच पिंपळगाव व लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांच्या कार्यालय तसेच गुदामांवर ...

ठळक मुद्देप्राप्तिकराच्या कारवाईचे पडसाद : ठिकठिकाणी कांदा दरात घसरण, शेतकरी संतप्त

पिंपळगाव बसवंत : कांद्याने पाच हजार रु पयांचा टप्पा ओलांडताच पिंपळगाव व लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांच्या कार्यालय तसेच गुदामांवर प्राप्तिकर विभागाने बुधवारी (दि.१४) तपासणीसाठी धडक मारताच गुरूवारी विंचूर व लासलगावी व्यापाºयांकडून कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले. पिंपळगाव शहरातही एका बड्या व्यापाºयाची चौकशी करण्यात आली. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरळीत चालू होते. दरम्यान, या साºया प्रकारामुळे काद्यांच्या दरात प्रतिक्विंटल ४८० रु पयांची घसरण झाल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली.प्राप्तिकर विभागाने बुधवारी निफाड व येवला तालुक्यातील बारा व्यापाºयांच्या कार्यालय आणि गुदामांवर धाड मारली. त्यामुळे लासलगाव व विंचूर येथे लिलाव बंद पहावयास मिळाला मात्र पिंपळगाव बाजार समितीत कांद्यांच्या भावात ४८० रूपयांची घसरण झाल्याची दिसून आली. प्राप्तिकर विभागाच्या कारवाईमुळे कांदा बाजारात खळबळ उडाली असून या व्यापाºयांचे धाबे दणाणले आहे.कांदा भाव वाढण्याची आशाउन्हाळ कांद्याची टंचाई जाणवू लागल्याने कांद्याने पाच हजारी पार केली. भविष्यात दर गगनाला भिडू नये यासाठी प्राप्तीकर विभागाने बुधवारी लासलगाव येथील १२ तर पिंपळगाव येथील एका कांदा व्यापाºयाच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. मात्र, उन्हाळ कांदा बाजारात दाखल होण्यास अजून दोन महिने अवकाश असल्याने कांदा टंचाई निश्चित होणार असल्याने भविष्यात कांद्याचे दर वाढणार असा विश्वास शेतकºयांमधून व्यक्त केला जात आहे. गुरुवारी पिंपळगाव बाजार समितीत कांद्याचे कमीत कमी २४०१ तर जास्तीत जास्त ५५०१ रूपये आणि सरासरी ४६५१ रुपये दर राहिले.व्यापाºयांकडून कांद्यांचा साठा ?व्यापाºयांनी कांद्यांचा साठा केल्याचा संशय प्राप्तिकर विभागाला आहे. त्यामुळे पिंपळगाव, लासलगाव येथील कांदा व्यापाºयांवर प्राप्तिकर विभागाने बुधवारी कारवाई करीत घरे, कार्यालये आणि गुदामांची झडती घेतली होती. कांदा व्यापाºयांच्या महिनाभरातील खरेदी-विक्र ी व्यवहारांची आयकर विभाग चौकशी करणार असून व्यापाºयांच्या कार्यालयांतील महत्वाची कागदपत्रे अधिकाºयांनी ताब्यात घेतल्याचे समजते.कांदा टंचाई मुळे भाव वाढल्याने प्राप्तिकर विभाग व्यापाºयांच्या गुदाम व कार्यालयात तपासणी करत आहे. ते त्यांचे काम करत आहेत. दरात समतोल राखण्याचे काम कदाचित ते करत असावे. मात्र व्यापाºयांनी कांद्याची कोणतीही साठवणूक केली नाही त्यामुळे घाबरून जाण्यासारखे काही नाही.- अतुल शहा , कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंतकेंद्राचा जीडीपी आधीच खाली आला आहे. त्यात कोरोनाच्या पाशर््वभूमीवर फक्त शेतकरीच मेहनत करून जनतेला अन्न, धान्य पुरवित आहे. आता कांदा टंचाईच्या काळात शेतकºयांना चार पैसे मिळत असतील तर आडकाठी आणण्याची काही गरज आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येईल, अशी भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने घेऊ नये.- दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बसवंत बाजार समितीकांदा दराने अजून उच्चांक गाठू नये यासाठी प्राप्तीकर विभागाने तपासणी सुरू केली आहे. व्यापाºयांना घाबरविण्याचा हा प्रकार आहे. या तपासणी सत्रामुळे व्यापारी नाराज होण्याचीच शक्यता अधिक आहे.- प्रकाश ठक्कर, कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंतशेतकरी आधीच अस्मानी संकटातून वाटचाल करीत आहे. कांदा विक्र ीतून शेतकºयांच्या हातात चार पैसे येण्याची वेळ आली असताना तपासणीसत्रामुळे कांदा दरात घसरण होवून शेतकºयांना नुकसान होणार आहे.- दिपक शिंदे, प्रगतशील शेतकरी, आहेरगावव्यापाºयांची तपासणी करत केंद्र सरकारने नव्या कृषी विधेयकांना स्वत:च हरताळ फासला आहे. निर्यात बंदी केली. कांद्याचे भाव कोसळले. परंतु देशांतर्गत मागणी मुळे पुन्हा कांद्याला थोडेसे भाव वाढू लागले. हे विस्कळीत करण्यासाठी व बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केंद्राचे हे उद्योग चालले आहेत. यात व्यापाºयांवर कारवाई करण्याचा आभास निर्माण केला असला तरी शेतकºयांचेच मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार हे निश्चित.- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

 

टॅग्स :Marketबाजारonionकांदा