शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

मनमाड बाजार समितीत कांद्याची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 00:18 IST

मनमाड: येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गेल्या सोमवारच्या तुलनेत बुधवारी (दि.९) शेतमालाची आवक घटली आहे.

ठळक मुद्देलाल कांद्याला २७०० रुपये बाजारभाव मिळाला.

मनमाड: येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गेल्या सोमवारच्या तुलनेत बुधवारी (दि.९) शेतमालाची आवक घटली आहे. कृषी कायद्याच्या विरोधात मंगळवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनामुळे मनमाड बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. बंद नंतर बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढेल असा अंदाज असला तरी बुधवारी मात्र शेतमालाची आवक कमी झाली आहे.सोमवारी उन्हाळ कांद्याला सरासरी १७००, तर लाल कांद्याला २४०० रुपये दर मिळाला होता. बुधवारी बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला २४५९, तर लाल कांद्याला २७०० रुपये बाजारभाव मिळाला.मनमाड बाजारात समितीमध्ये सोमवार ते शुक्रवार धान्य लिलाव होत असतात. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीमध्ये मक्याची चांगली आवक झाली आहे. सध्या बाजार समितीत सर्वत्र मका दिसत असून, इतर धान्य किरकोळ प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. बाजार समितीत होणाऱ्या सर्व व्यवहारावर करडी नजर ठेवण्यात येत आहेयावर्षी अतिवृष्टीमुळे लाल कांद्याचे नुकसान झाल्याने उत्पादन कमी निघाले असल्याने बाजार समितीमध्ये आवक घटली आहे. नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे- योगेश पुंडलिक आहेर, भालूरयावर्षी बदलत्या हवामानामुळे कांदा रोपांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांना कांदा बियाणे वेळोवेळी ज्यादा दराने खरेदी करावे लागले. त्यानंतरही निसर्गाच्या लहरीपणामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली आहे.- कौतिक हारदे, मोहेंगाव

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार