शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरेत शेतीकामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:36 IST

एकलहरे परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामांना वेग आला असून, भाजीपाल्याची मशागत, खरीप पिकांची पेरणी, वेलवर्गीय भाज्यांची छाटणी या कामात शेतकरी व्यस्त आहेत.

ठळक मुद्देपावसाची विश्रांती : खरीप पिकांची पेरणी, भाजीपाल्यांची मशागत

एकलहरे : परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामांना वेग आला असून, भाजीपाल्याची मशागत, खरीप पिकांची पेरणी, वेलवर्गीय भाज्यांची छाटणी या कामात शेतकरी व्यस्त आहेत.एकलहरे परिसरात गेल्या आठवड्यात पुनर्वसूच्या पहिल्या चरणात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतात चांगली ओल निर्माण झाली. आता पावसाने उघडीप दिल्याने जमिनीत चांगला वाफसा निर्माण झाला आहे. आधीच तयार केलेल्या शेतात आता सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग, तागाची पेरणी शेतकरी करू लागले आहेत. भाताची रोपे टाकून पंधरा दिवस झाले आहेत.अजून महिनाभरात भाताची रोपे लागवडीस येतील. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी वेलवर्गीय दुधी भोपळा, कारली, गिलकी ही पिके घेतली आहेत. सध्या प्राथमिकअवस्थेतील द्राक्ष बागेत आंतरपिक म्हणून अनेकांनी दुधी भोपळ्याची लागवड केली आहे. या दुधी भोपळ्याची आंतर मशागत, फवारणी, शेडाबाळीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.द्राक्षबागा जोमातएकलहरे परिसरातील कोटमगाव, सामनगाव, चाडेगाव, जाखोरी, हिंगणवेढे, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी या परिसरात द्राक्षबागा जोमात बहरल्या आहेत. सध्या चांगला पाऊस पडला असल्याने द्राक्षबागेच्या काड्यांचे पोषण होऊन जोमाने वाढ होत आहे. द्राक्षबागेची काडी धरण्याचा हा हंगाम असल्याने काडीचे पोषण चांगले झाले की पुढे फळधारणा भरपूर व चांगली होते. त्यानंतर आॅक्टोबर छाटणी होऊन द्राक्षमणी भरण्यास मदत होते, असे शेतकरी सांगतात.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती