नाशिक : जिल्'ातील ग्रामीण भागात शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस कोसळलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे एक हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले असून, पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत. सोमवारी दुपारी निफाड तालुक्यातील शिंगवे येथे वीज पडून शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना घडली. शनिवारी नांदगाव, येवला, दिंडोरी, देवळा व मालेगाव या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने कांदा, डाळींब, हरभरा, गहू या पिकांचे नुकसान झाले. नांदगावला सहा मेंढ्या, तीन शेळ्या, १५३ कोंबड्या मृत्युमुखी पडल्या, तर १७४ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. येवला येथे वीज पडून तीन जनावरे मरण पावली. दिंडोरी येथेही एक व्यक्ती वीज पडून जखमी झाली आहे. रविवारीही पाऊस झाल्याने दोन दिवसांत १०५६ हेक्टरचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक नुकसान नांदगाव तालुक्यात झाले असून, त्या खालोखाल देवळा तालुक्याला पावसाने झोडपले आहे. सोमवारी दुपारी निफाड तालुक्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह वीज पडून शिंगवे येथील निवृत्ती शशिकांत भागवत (५०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
जिल्'ात एक हजार हेक्टरचे नुकसान निफाडला वीज पडून शेतकरी ठार
By admin | Updated: April 14, 2015 01:11 IST