शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
5
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
6
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
7
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
8
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
9
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
10
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
11
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
12
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
13
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
14
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
15
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
16
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
17
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
18
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
19
Nana Patekar : नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
20
'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव..

ममदापूरच्या जंगलात एक हजार काळवीट

By admin | Updated: May 25, 2017 01:26 IST

नाशिक : सुमारे साडेपाच हजार हेक्टर जागेत असलेल्या ममदापूर संवर्धन राखीव जंगलात हरणाच्या काळवीट प्रजातीची संख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे.

अझहर शेख । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सुमारे साडेपाच हजार हेक्टर जागेत असलेल्या ममदापूर संवर्धन राखीव जंगलात हरणाच्या काळवीट प्रजातीची संख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात झालेल्या प्रगणनेअंतर्गत सुमारे एक हजार ४२ काळवीट आढळून आले हे शुभ वर्तमान मानले जात आहे. गतवर्षाच्या तुलनेत पंधरा टक्क्यांनी काळविटांच्या संख्येत वाढ झाली आहे.  येवला तालुक्यातील ममदापूर, राजापूर, देवदरी, खरवंडी, सोमठाण, रेंदळे या गावांच्या परिसरात विस्तारलेले जंगल काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. नाशिक वन विभाग पूर्वच्या हद्दीतील येवला वनपरिक्षेत्रांतर्गत या संवर्धन क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. काळविटांची संख्या वाढण्यासाठी त्यांना पोषक असे वातावरण व योग्य त्या सोयी उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. संपूर्ण संवर्धन क्षेत्रात ठिकठिकाणी वनविभागाच्या वतीने पाणवठे तयार करण्यात आले आहे. तसेच सीमेंटचे बंधारे बांधण्यात आल्याने पाण्याची मोठी समस्या मार्गी लागली आहे.  काळविटांचे जंगलातून बाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पाण्याची सोय व गवतासह अन्य प्रकारच्या झाडाझुडपांची लपण संवर्धन क्षेत्रात वाढविण्यावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी भर दिल्यामुळे काळविटांचा संवर्धन क्षेत्रात मुक्काम वाढीस लागला आहे. या वनसंवर्धन राखीव क्षेत्राच्या परिसरात लांडगा, मोर, तरस, रानडुक्कर यांचेही संवर्धन होत आहे. काळविटांची भटकंती थांबल्याने सुरक्षा बळकट झाली आहे.पाच महिन्यांत दोन हल्ले, एक अपघात ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये पाणवठे व सीमेंटचे बंधारे बांधण्यात आल्यामुळे काळविटांचा जंगलात मुक्काम वाढला आहे. यामुळे दुर्घटनांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे. पाण्याच्या शोधात भटकंती करताना कुत्र्यांच्या हल्ल्यात किंवा वाहनांच्या धडकेत काळवीट मृत्युमुखी अथवा जखमी होण्याच्या घटना घडत होत्या. या पाच महिन्यांत कुत्र्यांनी काळविटांवर दोनदा हल्ले केले तर एकदा अपघातात काळवीट जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या वर्षी अपघात व कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या सुमारे दहा ते पंधरा घटना घडल्या होत्या.