नाशिक : सातपूरच्या सोमेश्वर कॉलनीतील इसमाने विष प्राशन करून आत्महत्त्या केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, सोमेश्वर कॉलनीतील प्रवीण गुलाब तंवर (३४) याचा मृतदेह कामगारनगरजवळील जॉगिंग ट्रॅकवर असल्याची माहिती संत कबीरनगरमधील रहिवाशांनी सातपूर पोलिसांना दिली़ पोलिसांना घटनास्थळाजवळ विषाची बाटली आढळून आल्याने तंवरने विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येतो आहे़
विष प्राशन करून एकाची आत्महत्त्या
By admin | Updated: July 19, 2014 21:17 IST