शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

वृध्दाच्या बँकखात्यातून एक लाखाची रोकड गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:47 IST

इंदिरानगर : एटीएम केंद्रात एका ज्येष्ठ नागरिकाला अदलाबदल करत एका भामट्याने मदतीचा बनाव करून तब्बल १ लाख ५०० रुपयांना चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार इंदिरानगर भागात घडला आहे. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिक मुनीरोद्दीन कासम शेख (६४, रा.कुतुब सोसायटी, अशोकामार्ग) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देडेबिट कार्डाची अदलाबदल : मदतीचा बहाणा करत फसवणूक

इंदिरानगर : एटीएम केंद्रात एका ज्येष्ठ नागरिकाला अदलाबदल करत एका भामट्याने मदतीचा बनाव करून तब्बल १ लाख ५०० रुपयांना चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार इंदिरानगर भागात घडला आहे. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिक मुनीरोद्दीन कासम शेख (६४, रा.कुतुब सोसायटी, अशोकामार्ग) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, येथील एका एटीएम केंद्रातून मिनी स्टेटमेंट प्राप्त करून घेत असताना सेवानिवृत्त शेख यांना काही तांत्रिक अडचणी जाणवत असल्याचे बघून त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या एका भामट्याने मदतीचा बहाणा करत डेबिट कार्डाची अदलाबदल करून घेतली तसेच त्यांचा गोपनीय क्रमांक जाणून घेत एटीएम केंद्रातून पोबारा केला. हा प्रकार बापू बंगल्याजवळ एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये घडला.

त्या संशयिताने साहेबराव शंकर गोडसे यांच्या नावाचे डेबिट कार्ड शेख यांच्या हातावर टेकवून धूम ठोकली. त्यांनी पुन्हा एकदा स्टेटमेंट काढण्याचा प्रयत्न केला असता पावती येत नसल्याने त्यांनीही केंद्रातून काढता पाय घेतला. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांचा मुलगा वसीम यांच्या मोबाइलवर खात्यातून रक्कम काढल्याचा बँकेचा मॅसेज आला. तेव्हा त्यांनी बोधलेनगर एसबीआय बँकेत जाऊन पासबुक भरून घेतले तेव्हा लक्षात आले की, कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खात्यातून १३ फेब्रुवारी रोजी चौधरी प्लाझा येथील आयसीआयसीआय बँकेच्या राजीवनगर एटीएममधून चार वेळा प्रत्येकी दहा हजार रुपयेप्रमाणे ४० हजार रुपये काढून घेतले.

त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी आयसीआयसीआय बँकेच्या इंदिरानगर येथील एटीएम केंद्रातून चार वेळेस १० हजार रुपये असे पुन्हा चाळीस हजार रुपये, तर १५ फेब्रुवारी रोजी दोनदा दहा हजार रुपये असे वीस हजार आणि पाचशे रुपये बँक ऑफ महाराष्ट्रच्या इंदिरानगर एटीएममधून काढून घेतल्याची माहिती त्यांना मिळाली.

यावरून बँकेचे खातेधारक शेख यांची अज्ञात चोरट्याने १ लाख ५०० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांकडून एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्याची तपासणी करत त्या भामट्याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :atmएटीएमCrime Newsगुन्हेगारी