दिंडोरी : तालुक्यातील भनवड यात्रेत युवकांमध्ये झालेल्या किरकोळ वादात एक युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रक्रणी वणी पोलिसांनी एक संशियत आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर काशीनाथ मुरलीधर शेवरे (28) असे मयत युवकाचे नाव आहे.भनवड येथील यात्रेत काशीनाथ शेवरे व तुषार नामदेव गांगोडे (20, रा. ननाशी) यांच्यात वाद होत हाणामारी झाली. त्यात काशीनाथ यास जबर मार लागत तो जागेवर कोसळला होता. यानंतर ग्रामस्थांनी त्यास तातडीने दिंडोरी येथे उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. तर पोलिसांनी संशियत आरोपी तुषार नामदेव गांगोडे यास ताब्यात घेतले. पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी यांनी घटनास्थळी भेट दिली.
भनवड येथील यात्रेत एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:52 IST