त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरपासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेझे फाट्याच्या पुढे स्कोडा कारच्या धडकेने दुचाकीजवळ उभे असलेला एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.दुचाकी क्र .एम एच १५ डी एफ १५१६ उभी करु न दुचाकीवरील दोघे जण बोलत उभे होते. स्कोडा कार क्र .एम एच ४३ एल ०४०१ कारने दुचाकीला जोराची धडक देउन दुचाकीजवळ उभे असलेले दिपक बापु कांडेकर (२८) रा.तळेगाव (अंजनेरी) हा जागीच मरण पावला तर दीपक सुधाकर दाते (२५), रा.तळेगाव याच्या डोक्यास मार लागल्याने गंभीर जखमी झाला. याबरोबरच कारमधील एक जखमी झाला आहे. कार निष्काळजीपणे चालविणा-या चालकाचे नाव अद्याप समजले नाही. कार चालकाविरूध्द त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी त्र्यंबक पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी भेट दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय खैरनार आदी अधिक तपास करीत आहेत.