शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

शिरसगावजवळ अपघातात एक ठार

By admin | Updated: February 20, 2016 21:26 IST

शिरसगावजवळ अपघातात एक ठार

 पाटोदा : येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील जागृत देवस्थान असणाऱ्या वजे्रश्वरी देवीच्या यात्रेसाठी कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर येथून ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांच्या गाडीला अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरीजवळ अपघात झाला. या अपघातात शिरसगाव येथील एक भाविक जागीच ठार झाला, तर पाचजण जखमी झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.शिरसगाव येथे श्री वज्रेश्वरी-मातेचा यात्रोत्सव सुरू असून, या यात्रेसाठी येथील आर्यपुत्र व्यायामशाळेचे सुमारे ५० ते ६० भाविक कोल्हापूर येथे ज्योत आणण्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना राहुरीजवळ पहाटे १ वाजेच्या सुमारास ट्रकने (क्र. एपी १२-५२८९) भाविकांच्या पिकअपला धडक दिल्याने पाठीमागे बसलेले भाविक खाली कोसळले. यात अमोल सोनूबापू आजगे (२१, रा, वळदगाव) याचा जागीच मृत्यू झाला, तर सुनील महिपत आजगे (२३), उमेशकुमार शिवाजी वादगे (३०), संतोष शिवराम आजगे (३३), धनंजय प्रभाकर वादगे (३२), विश्वास भास्कर आजगे (२६) सर्व वळदगाव हे जखमी झाले. अपघाताचे वृत्त शिरसगाव येथे कळताच गावावर शोककळा पसरली. अमोल आजगे याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)