------------------------------------------------------------------------------
चांदवडला दोन दिवसांत ७७ नवीन रुग्ण
चांदवड : येथे दि. २६ एप्रिल रोजी शंभर व्यक्तीपैकी ३० अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. दि. २८ एप्रिल रोजी ३४४ व्यक्तीपैकी ४७ अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे एकूण ७७ जण पॉझिटिव्ह आले. तर पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण चांदवड शहरातील विविध भागात आहेत. तालुक्यातील आडगाव, भाटगाव, दरेगाव, धोंडबे, डोणगाव, दुगाव, हट्टी, खडकओझर, कुंडाणो, सोग्रस, तांगडी, उसवाड, वडाळीभोई , देवरगाव, धोंडगव्हाण, धोंडगव्हाणवाडी, दिघवद, गंगावे, काळखोडे, कन्हेरवाही, काजीसांगवी, मेसनखेडे खुर्द, पाथरशेंबे , पिंपळनारे, पुरी, रायपूर, शिरसाणो, शिंगवे, सोनीसांगवी, तळेगावरोही , वडनेरभैरव एकूण ७७ जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ .पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली .
---------------------------------------------------------------------------
कानडगावला शेतीच्या वादातून तिघांना मारहाण
चांदवड : तालुक्यातील कानडगाव येथे शेतीच्या वादातून तिघांना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत मुरलीधर राजाराम बिडगर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दंगलीचा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. कानडगाव येथील रावसाहेब गोविंद मोरे , समाधान सजन मोरे , रवी सजन मोरे , विजय सजन मोरे , मोहन बबन सोनवणे (सर्व राहणार कानडगाव) यांनी गैर कायद्याची मंडळी जमा करून हातात काठ्या, कुऱ्हाडीचे दांडे घेऊन रावसाहेब मोरे व त्यांच्या मुलास मोटार चालू करण्यासाठी गेले असता मोटार का चालू केली या कारणावरून हातातील काठ्या व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. उजव्या पायाच्या मांडीवर व उजव्या दंडावर मारून जबरदस्त जखमी केले. विहिरीवरील पाईपलाईन फोडून त्यांचे मोठे नुकसान केले, या कारणावरून राजाराम मोरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
--------------------------------------------------------------------------