शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वडाळागावात पाच संशयितांकडून एकावर शस्त्राने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:40 IST

नाशिक : भावास शिवीगाळ केल्याची कुरापत काढून पाच संशयितांनी एकास बेदम मारहाण करीत धारदार शस्त्राने वार केल्याची घटना वडाळागावातील म्हाडा कॉलनीत घडली आहे़ मोसीम ऊर्फ चिड्या शहा (३३, रा. म्हाडा वसाहत) हे मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ठळक मुद्दे पाच संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल

नाशिक : भावास शिवीगाळ केल्याची कुरापत काढून पाच संशयितांनी एकास बेदम मारहाण करीत धारदार शस्त्राने वार केल्याची घटना वडाळागावातील म्हाडा कॉलनीत घडली आहे़ मोसीम ऊर्फ चिड्या शहा (३३, रा. म्हाडा वसाहत) हे मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि़२५) रात्री नऊ वाजेच्या सुमारास संशयित काल्या ऊर्फ ग्यासउद्दिन शेख व त्याच्या चौघा साथीदारांनी मोसीम शहा यांना माज्या भावास तुज्या नातलगांनी शिवीगाळ का केली अशी कुरापत काढली़ यानंतर चौघांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली, तर संशयित बशीर ऊर्फ शेऱ्या याने मोसीनवर धारदार हत्याराने वार केले़

या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित शाहरुख शेख (२२, रा. मेहबूबनगर) आणि वशील सय्यद (३१, रा. वडाळा) या दोघांना अटक केली आहे.

चक्कर येऊन पडल्याने युवकाचा मृत्यूनाशिक : पंचवटीतील मालेगाव स्टॅण्डवर अचानक चक्कर येऊन पडल्याचे ३२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ हरिष राजपालगिरी गोसावी (रा.जनार्दननगर,नांदूरनाका) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. अचानक चक्कर येऊन पडल्याने हरिष यास त्याचे मामा राजेंद्र गोसावी यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गोदावरी नदीपात्रात मृतदेहनाशिक : चोपडा लॉन्सजवळील नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना शुक्रवारी (दि़२६) दुपारच्या सुमारास घडली़ साधारणत: ३५ ते ४० वयोगटांतील इसमाचा हा मृतदेह असून, त्याची अद्याप ओळख पटलेली नाही़ दरम्यान, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक