शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

एक कारखाना, तीन कामगार संघटना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:46 IST

अवघ्या शंभर कायम कामगारांची संख्या असलेल्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील ड्रिलबिट कंपनीत तब्बल तीन कामगार संघटना कार्यरत असून, त्यातील एका संघटनेचे सदस्य असलेले जवळपास ८० कामगार गेल्या २३ दिवसांपासून संपावर आहेत, तर दुसऱ्या संघटनेचे सदस्य असलेल्या १४ कामगारांचा नुकताच वेतनवाढीचा करार झाला आहे. तिसºया संघटनेमध्ये नेमके किती कामगार आहेत.

सातपूर : अवघ्या शंभर कायम कामगारांची संख्या असलेल्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील ड्रिलबिट कंपनीत तब्बल तीन कामगार संघटना कार्यरत असून, त्यातील एका संघटनेचे सदस्य असलेले जवळपास ८० कामगार गेल्या २३ दिवसांपासून संपावर आहेत, तर दुसऱ्या संघटनेचे सदस्य असलेल्या १४ कामगारांचा नुकताच वेतनवाढीचा करार झाला आहे. तिसºया संघटनेमध्ये नेमके किती कामगार आहेत. याची कोणाला माहिती नाही, कामगार संघटनांचे हे त्रांगडे पाहता त्यातून कामगारांचा प्रश्न सुटण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.सातपूर औद्योगिक वसाहतीतील ड्रिलबिट कंपनीत अवघ्या १०० च्या आसपास कायम कामगारांची संख्या आहे. तरीही तब्बल तीन कामगार संघटना या कामगारांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यातील समर्थ कामगार संघटनेकडे १४ सभासद आहेत. सिटूप्रणीत नाशिक वर्कर्स युनियनकडे जवळपास ८० सभासद आहेत. (या कामगारांनी २३ दिवसांपासून संप पुकारलेला आहे) तर ड्रिलबिट इंडिया अंतर्गत कामगार संघटनेकडे ५ ते ६ सभासद असतील. या तीनही कामगार संघटनेच्या सभासदांमध्ये प्रचंड चढाओढ निर्माण झाली आहे. कामगारांमधील अंतर्गत वादाचा फायदा व्यवस्थापनालाच होत असून, विविध संघटनांमध्ये विखुरलेल्या कामगारांमध्ये एकजूट होत नसल्याने दिवसेंदिवस प्रश्न चिघळत चालला आहे.सुविधा मिळणारमहाराष्ट्र समर्थ कामगार संघटना आणि ड्रिलबिट कंपनी व्यवस्थापन यांच्यात २७ आॅगस्ट रोजी वेतनवाढीचा करार करण्यात आला. या संघटनेच्या १४ सभासदांना करारानुसार दरमहा ८ हजार ९०० रुपयांची वेतनवाढ मिळणार आहे. त्याचबरोबर मेडिक्लेम आणि बंद पडलेली कॅण्टीन सुविधा मिळणार आहे. या करारावर व्यवस्थापनाच्या वतीने प्लॅण्ट हेड बर्नाड कोन्हेन, एम.एस. कासलकर, रूपेश परदेशी, दीपक कुलकर्णी, असिफ शेख, तर युनियनच्या वतीने जगन्नाथ सरवार, राकेश अहिरे, सुनील घाडगे, विलास नेटावटे, नामदेव बागुल, दिगंबर गायकवाड आदींनी स्वाक्षºया केल्या.विरोधाभासकामगारांच्या मागण्यांसाठी सिटूचे नेतृत्व स्वीकरलेल्या ८० कायम कामगारांनी ६ आॅगस्टपासून संप पुकारला आहे. पूर्वी हे कामगार महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचेच सभासद होते. गेल्या २३ दिवसांपासून हे कामगार संपावर आहेत. या संपकरी कामगारांच्या समोरच वेतनवाढीचा करार केलेल्या १४ कामगारांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. एकीकडे आनंदोत्सव, तर दुसरीकडे प्रचंड रोष असे चित्र निर्माण झाले होते.

टॅग्स :Employeeकर्मचारीMIDCएमआयडीसी