शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजकावर दुचाकी आदळून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:11 IST

भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात आनंदवलीतील तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़१७) दुपारच्या सुमारास एबीबी सर्कलजवळ घडली़ नहुश कैलास कडलग (२२, रा. नवश्या गणपती मंदिराजवळ, आनंदवली, नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़

नाशिक : भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात आनंदवलीतील तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़१७) दुपारच्या सुमारास एबीबी सर्कलजवळ घडली़ नहुश कैलास कडलग (२२, रा. नवश्या गणपती मंदिराजवळ, आनंदवली, नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कडलग व त्याचा मित्र संकेत सुधाकर भालेराव (२६, रा. फ्लॅट नंबर ७, एमआयजी, उपेंद्रनगरसमोर, अंबड लिंकरोड) हे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नवीन केटीएम दुचाकीने सिटी सेंटर मॉलकडून एबीबी सर्कलकडे येत होते़ एबीबी सर्कलजवळील मिल अ‍ॅण्ड व्हील्स हॉटेलसमोरील वळणावर त्यांची भरधाव दुचाकी दुभाजकावर जाऊन आदळली़ यामध्ये नऊश कडलग याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला़ तर त्याच्या पाठीमागे बसलेला संकेत भालेराव हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर श्री गुरुजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ एबीबी सर्कलजवळ दुभाजकावर आदळून अपघात होण्याचे महिन्यातील दुसरी घटना आहे.या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, गंगापूर पोलीस ठाण्यात दुचाकीचालक कडलग याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Accidentअपघात