शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वनविभाग लावणार एक कोटी रोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:34 IST

राज्य शासनाच्या वन मंत्रालयाकडून राज्यभरात वनविभागाच्या सर्व फोरम व अन्य शासकीय, निमशासकीय आस्थापनांद्वारे ३३ कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमाला सोमवारी (दि.१) प्रारंभ केला जाणार आहे.

नाशिक : राज्य शासनाच्या वन मंत्रालयाकडून राज्यभरात वनविभागाच्या सर्व फोरम व अन्य शासकीय, निमशासकीय आस्थापनांद्वारे ३३ कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमाला सोमवारी (दि.१) प्रारंभ केला जाणार आहे. याअंतर्गत वनविभागाच्यानाशिक वनवृत्तासाठी एक कोटी २७ लाख रोपे लागवडीच्या उपक्रमाचा शुभारंभ करणार आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनांना एकूण सुमारे एक कोटी ९२ लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे.राज्यातील वनजमिनी व वनइतर जमिनींचे क्षेत्र वृक्षाच्छदनाखाली आणण्यासाठी २०१६ सालापासून राज्य सरकारने ५० कोटी रोपे लागवडीचे अभियान अर्थात ‘वनमहोत्सव’ सुरू केला आहे. या अभियानाचे हे अखेरचे वर्ष असून, यावर्षी ३३ कोटी रोपे लागवडीचे ‘टार्गेट’ वन मंत्रालयाकडून संपूर्ण राज्यभरासाठी निश्चित करण्यात आले आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर असा कालावधी या अभियानाचा ठरविण्यात आला आहे. पावसाळ्यात वृक्षलागवड, संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीने जनसामन्यांमध्ये जनजागृती व्हावी आणि रोपे लागवडीची चळवळ व्यापक बनावी, हा यामागील उद्देश असल्याचे नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी सांगितले.नाशिक पश्चिम विभागाकडून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले या गावी वनजमिनीवर १५ हेक्टर जागेत सुमारे साडेसोळा हजार रोपे लावण्यात येणार आहे. या ठिकाणाहून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.जिल्हाभरात सर्व ग्रामपंचायतींनाही त्यांच्या हद्दीत रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मिळून सुमारे ४४ लाख २४ हजार रोपे लावायची आहेत. त्यांना प्रत्येकी तीन हजार २०० रोपांचे कमाल उद्दिष्ट्य पूर्ण करावयाचे आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमधून प्रत्येक ग्रामपंचायतीला रोपे मोफत पुरविली जाणार आहेत.वर्षनिहाय जिवंत रोपे अशी...जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून वनमहोत्सवांतर्गत रोपांची लागवड केली जात आहे. पहिल्या वर्षी (२०१६) २९.६९ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २९ लाख ५० हजार रोपांची लागवड झाली. त्यामध्ये ६८ टक्के रोपे जगल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. २०१७ साली २०.३ लाखांचे उद्दिष्ट दिले गेले होते. त्यापैकी ४३ लाख ४३ हजार रोपे लागवड झाली. त्यामध्ये ८१ टक्के रोपे जिवंत असून तिसऱ्या वर्षी ७२.२६ लाखांचे उद्दिष्ट पूर्ण करताना ७५ लाख ९१ हजार रोपे लागवड केली गेली. त्यापैकी ८७ टक्के रोपे जिवंत असल्याचा दावा वन-महसूल प्रशासनाने केला आहे. लागवड करण्यात आलेल्या रोपांमध्ये जिवंत राहिलेल्या रोपांची नोंद आॅक्टोबर व मे महिन्यात करण्यात येते. ही आकडेवारी आॅनलाइन पद्धतीने संनियंत्रित केली जाते.२ कोटी २७ लाख रोपे तयारजिल्ह्याला १ कोटी ९२ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी १ कोटी २७ लाख रोपे वनविभागाला लावायची आहेत. उर्वरित ६५ लाखांपैकी ४४ लाख रोपे ग्रामपंचायती मिळून आणि २१ लाख रोपे अन्य शासकीय, निमशासकीय संस्थांना मिळून लावायची आहेत. त्यासाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळाच्या जिल्ह्यातील ७३ रोपवाटिकांमध्ये सुमारे २ कोटी २७ लाख रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये काही रोपे १८ तर काही १० महिने तसेच काही ६ महिन्यांची आहेत. रोपनिर्मितीची प्रक्रिया मागील वर्षभरापासून सुरू होती. या सर्व रोपवाटिकांमधून ग्रामपंचायतींना मोफत तर अन्य शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांना वनमहोत्सवानिमित्त सवलतीच्या दरात रोपे पुरविली जाणार आहेत.पूर्व विभागाला २८, तर पश्चिमला २६ लाखांचे टार्गेटवनविभाग पूर्वला २८ लाख, तर पश्चिमला २६ लाख रोपे लागवडीचे ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. या दोन्ही विभागांकडून त्यांच्या आठ ते नऊ वनपरिक्षेत्रांमध्ये वनजमिनीवर रोपांची लागवड केली जाणार आहे. जुलैअखेर रोपे लागवडीचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न राहणार असल्याचे फुले म्हणाले. यासाठी प्रत्येक वनपरिक्षेत्र अधिकाºयावर जबाबदारी निश्चित केली गेली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिक