नाशिक : महापालिकेतील कर्मचार्यांना लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसा देण्याची योजना आखली आहे. त्याला कर्मचार्यांकडून वर्षभरात अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला असून, तब्बल एक कोटी रुपयांची तरतूद संपली आहे. त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकातदेखील अधिक तरतूद करण्यात येणार आहे.महापालिकेच्या वतीने कर्मचार्यांना विविध कारणांसाठी अर्थसा दिले जाते. गृहकर्ज पूर्वी तीन लाख रुपयांपर्यंत दिले जात असे, आता ते पाच लाख रुपयांपर्यंत दिले जाते. त्यासाठी नऊ टक्के व्याजदर आकारला जातो. अशाच प्रकारे कर्मचार्यांना ३० हजार रुपये वाहन कर्ज दिले जाते. त्यासाठीही नऊ टक्के व्याजदर आकारला जातो. कर्मचार्यांना लॅपटॉप खरेदीसाठी २० हजार रुपयांपर्यंत अर्थसा दिले जाते. ही रक्कम अग्रीम स्वरूपात असल्याने त्यावर कोणतेही व्याज आकारले जात नाही. प्रशासनाने सुरू केलेल्या योजनेला कर्मचार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, वर्षभरात एक कोटीची तरतूद संपली आहे. आता नव्या अंदाजपत्रकातही त्यासाठी तरतूद करावी लागणार आहे. एका कर्मचार्याला वीस हजार रुपयांचे अर्थसााचा विचार केला तर पाचशे कर्मचार्यांनी लॅपटॉप खरेदी केले आहेत. सेवेत कायम असलेल्या कर्मचारीसंख्येचा विचार केला तर दहा टक्के कर्मचार्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अर्थात, ही खासगी खरेदी असल्याने पालिकेत कर्मचारी लॅपटॉपवर काम करीत आहेत असे चित्र आज तरी नाही. इतकेच नव्हे, तर अर्थसा मिळाले परंतु खरोखरीच लॅपटॉप खरेदी केला किंवा नाही याची खातरजमा प्रशासनाने केलेली नाही. केवळ लॅपटॉपचे कोटेशन दिल्यानंतर ही रक्कम अदा करण्यात आल्याचे लेखा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
पालिका कर्मचार्यांनी घेतले एक कोटीचे लॅपटॉप
By admin | Updated: May 16, 2014 00:25 IST