शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक भवनासाठी एक कोटीचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 17:51 IST

कळवण : नगरपंचायतच्या पुढाकाराने शहरात अत्याधुनिक सांस्कृतिक भवन साकारले जाणार असून त्यासाठी गणेशनगर भागातील जागेची निवड करण्यात आली असून जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनून एक कोटी रु पये मंजूर करण्यात आले आहेत. सन २०१८- २०१९ या आर्थिक वर्षात सांस्कृतिक भवनाचे काम पूर्ण करण्यात येणार असून या कामासाठी ४७ लाख १७ हजार रुपयाचा निधी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी कळवण प्रकल्प कार्यालयाकडे वितरीत केला आहे.

नगरपंचायत हद्दीत मनोरंजन व करमणुकीची कुठल्याही प्रकारची साधने नसल्याने मनोरंजन व करमणुकीसाठी कळवणकरांना नाशिक, मालेगाव येथे जावे लागते हे लक्षात घेऊन कळवण नगरपंचायतच्या १७ नोव्हेंबर २०१७ व १४ फेब्रुवारी २०१८ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी शासन स्तरावरुन एक कोटी रुपयांचा निधी मिळावा व शहरातील गणेशनगर भागातील गट नंबर १८७/३५ मध्ये सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे असा ठराव करण्यात आला.कळवण नगरपंचायत हद्दीत सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे यासाठी कळवण नगरपंचायतच्या प्रथम नगराध्यक्ष सौ. सुनीता पगार यांनी पुढाकार घेऊन शासनस्तरावर व सहाय्यक जिल्हाधिकारी अमन मित्तल व प्रशासकीय यंत्रणेकडे पत्रव्यवहार करु न प्रस्ताव सादर केला असल्याने जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनेच्या बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी कळवण नगरपंचायतच्या प्रस्तावित सांस्कृतिक भवनासाठी एक कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देऊन ४७ लाख १७ हजार रु पयांचा निधी कळवण प्रकल्प कार्यालयाकडे वितरीत केल्याने कळवणकरांचे स्वप्न दोन वर्षांत साकारणार आहे.माजी उपनगराध्यक्ष, नगरसेविका सौ भाग्यश्री पगार यांच्या प्रभाग क्र मांक तीनमध्ये गणेशनगर भागातील स्वामी विवेकानंद कॉलनीत नगरपंचायतच्या १६ हजार स्केअरफूट जागेपैकी ६ हजार स्केअरफूट जागेवर सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे. २०० प्रेक्षक बसू शकतील असे प्रेक्षकगृह, साऊंडप्रुफ व वातानुकूलित व्यवस्था या सांस्कृतिक भवनात तयार करण्यात येणार असून वाहनतळाची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष मयुर बहिरम, उपनगराध्यक्ष कौतिक पगार व मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांनी सांगितले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकfundsनिधी