नाशिक : ठाण्याच्या चेकमेट कंपनी दरोड्यात इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील संशयित वैभव लहामगेचा सहभाग उघड झाला आहे़ ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने शुक्रवारी (दि़ १) त्याच्या शेतातील विहिरीजवळ असलेल्या एका खड्ड्यातून बॅगमध्ये लपविलेली एक कोटी पाच लाख रुपयांची बॅग जप्त केली़ विशेष म्हणजे गावापासून दोन किलोमीटर दूर जंगलात असलेल्या लहामगेच्या शेतातच दरोड्यातील संपूर्ण रकमचे आपसात वाटप झाल्याचे वृत्त आहे़ चेकमेट कंपनीचे माजी व आजी कर्मचाऱ्यांसह सुमारे चौदा संशयितांनी दरोडा टाकून साडेनऊ कोटी रुपये लुटल्याची घटना ठाणे येथे घडली होती़ या दरोड्याचा पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये छडा लावून सहा जणांना अटक केली आहे़ तर उर्वरित फरार संशयितांमध्ये इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील वैभव लहामगेचा समावेश आहे़ या लुटीतील रक्कम ही सांजेगावजवळील लहामगेच्या शेतात आणून तिथेच वाटप करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय होता़ ठाणे पोलिसांचे एक पथक लहामगेच्या पाळतीवर होते़; मात्र तो न सापडल्याने तसेच मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शुक्रवारी ठाणे पोलिसांचे अधिकारी व २५ कर्मचारी सहा वाहनांच्या ताफ्यातून सांजेगावमध्ये दाखल झाले़ गावापासून दोन किलोमीटर दूर जंगलामध्ये असलेल्या शेताची पाहणी करण्यासाठी हे पथक चिखल तुडवित शेतात गेले़ तिथे ताडपत्रीचे एक साधे शेड बनविण्यात आले होते तसेच विहीरही खोदण्यात आली होती़ शेतामध्ये विविध ठिकाणी असलेल्या खड्ड्यांच्या संशयावरून या पथकाने दोन-तीन ठिकाणे खड्डे खणून तपासणी केली असता एका खड्ड्यातील बॅगमध्ये एक कोटी पाच लाख रुपयांची रोकड आढळून आली़ पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे़ या दरोड्यात कंपनीचे आजी माजी कर्मचारी सोडता बहुतांशी सर्व संशयित हे नाशिक शहर व जिल्ह्णातील आहे़ विशेष म्हणजे लहामगेची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचेही समोर आले आहे़ (प्रतिनिधी)शेतातच जाळले सीसीटीव्हीचे फुटेज चेकमेट कंपनीवर दरोडा टाकून कंपनीच्या आजी माजी कर्मचाऱ्यांसह सुमारे चौदा संशयितांनी तब्बल साडेनऊ कोटी रुपयांची लूट केली़ या लुटीचा पुरावा सापडू नये यासाठी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजही याच ठिकाणी जाळण्यात आल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे़
सांजेगाव येथील शेतातून एक कोटी पाच लाख जप्त
By admin | Updated: July 2, 2016 00:09 IST