शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी गावठी कट्ट्यासह एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 01:48 IST

मालेगाव येथील मनमाड चौफुली परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयित इसम मंजूर हुसेन मुजफ्फर हुसेन (३४) रा. गुलशने मालिक, स. नं. १०७ यास अटक केली.

मालेगाव : येथील मनमाड चौफुली परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयित इसम मंजूर हुसेन मुजफ्फर हुसेन (३४) रा. गुलशने मालिक, स. नं. १०७ यास अटक केली. त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्तूल, सात जिवंत काडतुसे व दोन मॅग्झीनसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी किल्ला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या पथकाने मनमाड चौफुली परिसरात हॉटेल साईसिद्धी समोर अग्निशस्त्रे बाळगणाºया इसमास ताब्यात घेतले. रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी मालेगाव शहरात सराईत गुन्हेगारांचा शोध घेत असताना खबºयामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मनमाड चौफुली परिसरात काही संशयित इसम अवैधरीत्या अग्निशस्त्रे बाळगून गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे समजले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने हॉटेल साईसिद्धीसमोर सापळा रचून संशयित मंजूर हुसेन मुजफ्फर हुसेन (३४) यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कब्जातून एक देशी बनावटीचे पिस्तूल, सात जिवंत काडतुसे, दोन मॅग्झीनसह गुन्ह्यात वापरलेली होण्डा शाइन दुचाकी हस्तगत करण्यात आली. विनापरवाना घातक अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या आठवड्यात अवैधरीत्या अग्निशस्त्र बाळगणाºया एकूण सहा आरोपींविरुद्ध कारवाई केली होती. पथकात सहायक पोलीस निरीक्षक सुनील अहिरे, हवालदार राजू मोरे, वसंत महाले, सुहास छत्रे,राकेश उबाळे, देवा गोविंद, फिरोज पठाण, रतिलाल वाघ यांचा समावेश आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकMalegaonमालेगांव