शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आयफोन लांबविणाऱ्या टोळीमधील एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:29 IST

गंगापूररोडवरील एलिमेंट या अ‍ॅपल कंपनीच्या दालनचे शटर उचकटून ८२ आयफोन, स्मार्टवॉचसह रोख रक्कम असा एकूण ७३ लाख ४६ हजार ५०० रुपयांची जबरी लूट करणाºया ‘चादर गॅँग’च्या गुन्हेगारांपैकी एका संशयिताला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यामधील एका गावातून अटक केली आहे. त्याच्याकडून चार आयफोन जप्त करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपथक नेपाळच्या सीमेवर : ‘चादर गॅँग’मधील गुन्हेगार निष्पन्न

नाशिक : गंगापूररोडवरील एलिमेंट या अ‍ॅपल कंपनीच्या दालनचे शटर उचकटून ८२ आयफोन, स्मार्टवॉचसह रोख रक्कम असा एकूण ७३ लाख ४६ हजार ५०० रुपयांची जबरी लूट करणाºया ‘चादर गॅँग’च्या गुन्हेगारांपैकी एका संशयिताला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यामधील एका गावातून अटक केली आहे. त्याच्याकडून चार आयफोन जप्त करण्यात आले आहेत.गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिनाभरापूर्वी सहा अज्ञात चोरट्यांनी एलिमेंट दुकानात जबरी लूट केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शहर गुन्हे शाखा युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बिहार गाठले. येथील घोडसाहन गावातून संशयित अजयकुमार मोहन साहा यास पथकाने अटक केली. त्याच्याकडून आयफोन कंपनीचे मोबाइल जप्त केले.लवकरच सर्व साथीदारांना अटक करण्यात येईल, असा विश्वास शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बिहार राज्याचे महासंचालकांशी संपर्क साधत या गुन्ह्यातील तपासात स्थानिक पोलिसांची गुन्हे शाखेच्या तपासी पथकाला मदत करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने एक संशयित पोलिसांना मिळून आला आहे.सात आरोपींचा समावेशमोबाइल चोरीच्या गुन्ह्यात तपासादरम्यान सात आरोपींचा समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. समीर ऊर्फ सेलुवा मुस्तफा दिवाण, सलमान ऊर्फबेलुवा मुस्तफा दिवाण, रियाज ऊर्फकैमुद्दीन मियां, नईम ऊर्फमुन्ना दिवाण, नसरु द्दीन बेचल मियां, मुस्लीम तैय्यम मियां ही सहा संशयितांची चादर गॅँग चोरीचे मोबाइल नेपाळ व बांगलादेशमध्ये जाऊन विक्र ी करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांचा एक साथीदार पोलिसांच्या हाती लागला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी