शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दस्त चोरीप्रकरणी एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:52 IST

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील मध्यवर्ती अभिलेख कार्यालयातून जतन करावयाचे अंगठे पुस्तक, महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज वरिष्ठ लिपिक रजेवर असताना संशयित सुनील गजानन पवार (रा. पंचक, जेल रोड) याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय रामदास ठाकरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देलिपिक फरार : बनविले बनावट रद्दबातल खरेदीखत

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील मध्यवर्ती अभिलेख कार्यालयातून जतन करावयाचे अंगठे पुस्तक, महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज वरिष्ठ लिपिक रजेवर असताना संशयित सुनील गजानन पवार (रा. पंचक, जेल रोड) याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय रामदास ठाकरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.संशयित पवार याच्या मदतीने संशयित विजय दत्तात्रय भागवत आणि दत्तात्रय सहादू भागवत या दोघांनी संगनमताने मृत सुधाकर बळवंत पाटील यांच्या देवळाली कॅम्पमधील शेतजमिनीविषयीचे बनावट रद्दबातल खरेदीखत तयार केल्याची फिर्याद अंकुश सुधाकर पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. त्यांच्या तक्रार अर्जाची दखल घेत आयुक्तांच्या आदेशान्वये पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विजय भागवत याला सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे.

भागवत याने पवारच्या मदतीने बनावट दस्त तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे. अभिलेख कार्यालयातून गहाळ झालेले महत्त्वाच्या सरकारी दस्तऐवजामागेही या प्रकरणाचा संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पाटील यांच्या वारसाची नोंद रद्दबातल ठरविण्यासाठी बनावट दस्त सादर करून संशयित भागवत याने देवळाली मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात २०१७ साली आक्षेप घेतला होता; मात्र ज्या दस्तांच्या आधारे आक्षेप घेतला गेला, ते दस्तऐवज बनावट असल्याचे दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांनी सिद्ध केले आहे.

कार्यालयाने याबाबत सुनावणीही घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणी विजय भागवत यास न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यास आज, शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच हा गुन्हा आता सरकारवाडा पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी