शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

दोन गावठी कट्ट्यांसह एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:30 IST

------ रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी मालेगाव : शहरातील सखावत हॉटेलजवळ रिक्षाने दुचाकीला दिलेल्या धडकेत मुलगा जखमी झाला आहे. रिक्षाचालकाविरुद्ध ...

------

रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

मालेगाव : शहरातील सखावत हॉटेलजवळ रिक्षाने दुचाकीला दिलेल्या धडकेत मुलगा जखमी झाला आहे. रिक्षाचालकाविरुद्ध आयेशा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहंमद साकीब याकूब यांनी आयेशानगर पोलिसात फिर्याद दिली आहे. मोहंमद साकीब हे दुचाकी क्रमांक एमएच ४१ एच ९६५ वरून जात असताना रिक्षा क्रमांक एमएच ४१ डी २८९३ वरील चालकाने धडक दिली. या धडकेत मुलगा जखमी झाला आहे. पुढील तपास हवालदार कदम करीत आहेत.

------

विवाहितेचा छळ करणाऱ्या चौघा जणांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : लग्नात मानपान दिला नाही, अशी कुरापत काढून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या पती प्रवीण शिवाजी अहिरे, रा. ठेंगोडा, ता. सटाणा याच्यासह अन्य तिघा जणांविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रीता प्रवीण अहिरे या विवाहितेने फिर्याद दिली आहे. पुढील तपास हवालदार पवार करीत आहेत.

------

ट्रक पळविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

मालेगाव : मुंबई - महामार्गावरील एका हॉटेलच्या मोकळ्या जागेतून १३ लाख रुपये किमतीची मालट्रक चोरून नेणाऱ्या तिघा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुलाब गफ्फार पिंजारी रा. जळगाव यांनी फिर्याद दिली आहे. त्याच्या ताब्यातील ट्रक क्रमांक एमएच १५ एफव्ही ७९४५ ही हॉटेल आवारात उभी असताना कुलदिप ऊर्फ गोलू तुळशिराम थोरात, अनिल भिका महाजन, गणेश सुभाष पवार या तिघांनी चोरून नेली आहे. पुढील तपास सहायक पाेलीस उपनिरीक्षक गुजर करीत आहेत.

------

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याविरुद्ध गुन्हा

मालेगाव : तालुक्यातील पाडळदे येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या सोपान पांडुरंग मंडळ रा. पाडळदे याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास गुजर करीत आहेत.

-------

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मालेगाव : तालुक्यातील गुगुळवाड शिवारात कारने समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार किशोर हिरामण गायकवाड (३८) रा. गुगुळवाड यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रकाश हिरामण गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. कार क्रमांक एमएच ०२ सीडब्ल्यू २६०९ वरील चालकाने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत किशोर गायकवाड यांचा मृत्यू झाला तर अनिल रामदास पवार जखमी झाले आहेत. याप्रकरणी पुढील तपास हवालदार गुजर करीत आहेत.

-------