शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख रोपे गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 01:28 IST

वीस दिवसांपूर्वी शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे ४५ हजार क्यूसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला होता. यामुळे दुपारी १२ वाजेपासून गोदावरीला महापूर आल्याचे चित्र पहावयास मिळाले.

नाशिक : वीस दिवसांपूर्वी शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे ४५ हजार क्यूसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला होता. यामुळे दुपारी १२ वाजेपासून गोदावरीला महापूर आल्याचे चित्र पहावयास मिळाले. या महापुराचा फटका गंगापूर-गोवर्धन शिवारात असलेल्या वनविभाग पश्चिम नाशिकच्या रोपवाटिकेसह सामाजिक वनीकरणाच्या गंगाकाठ रोपवाटिकेला बसला. गंगाकाठ रोपवाटिका पूर्णपणे पाण्यात बुडाल्याचे चित्र होते. कारण येथील पुलावरून महापुराचे पाणी वाहत होते. या दोन रोपवाटिकांमधील सुमारे दीड लाख रोपांचे नुकसान झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.गोदावरीला आलेल्या महापुरामुळे सामाजिक वनीकरणाच्या गंगाकाठ रोपवाटिका तसेच पश्चिम वनविभाग गंगापूर रोपवाटिकेमधील १४० प्रजातींच्या जवळपास १ लाख ३५ हजार रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पुरापूर्वी सामाजिक वनीकरणाच्या गंगाकाठ रोपवाटिकेत ३ लाख ६५ हजार रोपे, गंगापूर रापवाटिकेत ३ लाख ५ हजार रोपांचे संगोपन करण्यात आले होते. महापुरानंतर यामधील निम्या रोपांना पुराचा मोठा फटका बसला. यातील काही रोपांना वाचविण्यात यश आले. सुमारे दीड लाख रोपे सडल्यामुळे त्यांना फेकून देण्याची वेळ दोन्ही रोपवाटिकांना आली आहे. महापुरामुळे या रोपवाटिकांची दुरवस्था बघावयास मिळत आहे. यामधील अनेक रोपे पाण्याने सडली आहेत तर काही रोपे ही पाण्याने वाहून आलेल्या गाळाखाली दबली गेली आहेत. ही रोपे काढण्यासाठी वनमजुरांकडून प्रयत्न केले जात आहेत. ज्या रोपांची अवस्था बिकट झाली आहे, ती रोपे फे कून देण्याशिवाय पर्याय नाही. गंगाघाट रोपवाटिकेमधील पाच हजार लिटरच्या पाच पाण्याच्या टाक्या वाहून गेल्या.विविध प्रजातीच्या रोपांचे संगोपनरोपवाटिकांमध्ये आंबा, आवळा, हिरडा, रिठा, अशोका, महारुख, रुद्राक्ष, कदम, उंबर, बेल, पेरू, कैलासपती, जास्वंद, शिलारोप, बांबू, खाया, कतरजिव, चिंच, वड, पिंपळ, जांभूळ, सीताफळ यांसारख्या विविध प्रजातींच्या रोपांचे संगोपन करण्यात येते. त्यानंतर योग्य वाढ झालेली रोपे दरी-मातोरी, शीलापूर, मुंगसारे, ओढा, पिंपळगाव, तळेगाव, वाढोची या भागांमधील ग्रामपंचायतींना ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानासाठी पुरविली जाणार आहे. ३१ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याला वृक्षलागवडीचे टार्गेट पूर्ण करावयाचे आहे. अद्याप टार्गेट ९५ टक्क्यांपर्यंत आले आहे.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरforest departmentवनविभाग