शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख डोस कोविशिल्डचे डोस मागवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:32 IST

नाशिक - कोरोनाविरोधातील लढ्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत. एकीकडे सुपर स्प्रेडर्स शोधताना दुसरीकडे लसीकरणावरही भर देण्यात येत आहे. सध्या डोस कमी पडले असल्या तरी दीड लाख कोविशिल्डचे डोस मागवण्यात आले आहेत; तर लसीकरणात अडचणी येऊ नयेत यासाठी आणखी २४ रुग्णालयांना परवानगी देण्यात आल्याची माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्देकोरोना विरोधातील लढा : रविवारी लॅबची चाचणी

नाशिक - कोरोनाविरोधातील लढ्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत. एकीकडे सुपर स्प्रेडर्स शोधताना दुसरीकडे लसीकरणावरही भर देण्यात येत आहे. सध्या डोस कमी पडले असल्या तरी दीड लाख कोविशिल्डचे डोस मागवण्यात आले आहेत; तर लसीकरणात अडचणी येऊ नयेत यासाठी आणखी २४ रुग्णालयांना परवानगी देण्यात आल्याची माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी गुरुवारी दिली.नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्या संदर्भात आयुक्त जाधव यांनी ही माहिती दिली.प्रश्न - शहरात कोरोनाची संख्या वाढत असताना गेल्या काही दिवसांपासून लसीकरणात अडचणी येत आहेत.आयुक्त - होय. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अशा दोन प्रकारचे डोस नाशिकमध्ये प्राप्त झाले आहेत. मात्र, त्यातील कोविशिल्डचे डोस संपले आहेत. अगोदरच त्याची तयारी म्हणून दीड लाख डोस मागविण्यात आले आहेत. ते आज, शुक्रवारी प्राप्त होतील. त्यामुळे उद्या, शनिवार रविवारी (दि. २१) देखील लसीकरण करण्यात येईल. याशिवाय शहरात आणखी २४ खासगी रुग्णालयांत लसीकरणाची सोयय करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या केंद्रांवरील ताण कमी होईल.प्रश्न- कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पुन्हा रुग्णालयांची गरज वाढू लागली आहे.आयुक्त- कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. महापालिकेची आणि खासगी रुग्णालये मिळून एकूण ३ हजार ६३६ बेडस‌्ची सोय करण्यात आली आहे. त्यांपैकी सध्या एक हजार १०७ रुग्णच रुग्णालयात उपचार घेत असल्याने ८६ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत; परंतु सध्या रुग्णवाढीचा वेग बघितला तर कदाचित कोरोना केअर सेंटर्स सुरू करावी लागतील. त्या दृष्टीने नियोजन सुरू असून कंत्राटी पद्धतीने पाचशे आरोग्य-वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात येत आहे.प्रश्न- कोरोना चाचण्या वाढल्या तरी अहवाल खूप प्रलंबित आहेत. महापालिकेची लॅब केव्हा सुरू होणार?आयुक्त- महापालिकेची कोविड लॅब सुरू होण्याच्या मार्गावर आहे. येत्या रविवारी त्यात दोन नमुने तपासून तेच आयसीएमआरमध्ये पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर साधारणत: २५ मार्चपासून लॅब सुरू होईल. त्यामुळे अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण कमी होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका