शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सप्टेंबरमध्ये डेंग्यू रुग्णांचे दीड शतक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:57 IST

गतवर्षीच्या तुलनेत एकूणच डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असली तरी सप्टेंबर महिन्यात तब्बल १६५ रुग्ण आढळले आहेत. तर यंदाच्या वर्षी आत्तापर्यंत ३४२ रुग्ण आढळले असून, दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऐन सणासुदीत साथ वाढत असल्यामुळे शहरवासीय धास्तावले आहेत.

ठळक मुद्देगतवर्षीसारखीच स्थिती : संशयित रुग्णांबाबत शंका कायम महापालिकेच्या वतीने जनजागृती

नाशिक : गतवर्षीच्या तुलनेत एकूणच डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असली तरी सप्टेंबर महिन्यात तब्बल १६५ रुग्ण आढळले आहेत. तर यंदाच्या वर्षी आत्तापर्यंत ३४२ रुग्ण आढळले असून, दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऐन सणासुदीत साथ वाढत असल्यामुळे शहरवासीय धास्तावले आहेत.गेल्या महिन्यात सप्टेंबर महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत शहरात १०५ डेंग्यू रुग्ण होते, तर आॅगस्ट महिन्यात सुमारे १२० रुग्ण होते. तथापि, नंतर शहरात रुग्णांची संख्या वाढतच आहे. सप्टेंबर महिन्यात ही संख्या वाढेल, अशी चिन्हे होती. त्यानुसार ही संख्या वाढली असून, सरत्या महिन्यात १६५ रुण पॉझिटीव्ह आढळले आहेत. सप्टेंबर महिन्यातच एकूण ५९४ संशयित डेंग्यू आढळले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातदेखील १६५ रुग्ण आढळले होते, तर ५२० संशयित रुग्ण होते. संपूर्ण वर्षभराचा अंदाज घेतला तर गेल्यावर्षी ८४० डेंग्यू रुग्ण आढळले होते त्या तुलनेत यंदा पन्नास टक्क्यापेक्षा कमी म्हणजेच ३४२ रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, महापालिकेच्या वतीने काहीही दावा केला जात असला तरी त्या तुलनेत रुग्णसंख्या अधिक असून, अनेक जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत, असेदेखील सांगितले जात आहे.डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेकडून वारंवार नागरिकांना सूचना केल्या जातात. तसेच विशेष मोहीम राबवून पाणी साठवणीचे ठिकाणे नष्ट केली जातात. घरातील रिकामी भांडी, कुंड्या, फ्लॉवरपॉट, निकामी टायर अशा ठिकाणी पाणी साठले असल्यास सदर पाणी काढून टाकावे असे आवाहन पालिकेने केले आहे.‘त्या’ नागरिकांवर कारवाई नाही?महापालिकेच्या वतीने डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्यास संबंधित नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा यापूर्वी देण्यात आला होता. त्याचप्रमाणे दंडात्मक कारवाईचीदेखील तरतूद आहे. परंतु महापालिकेच्या वतीने डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असताना कारवाई केलेली नाही.यंदा पावसाळा लांबला, त्यातच तो सलग बरसला नाही. त्यामुळे पाणी साचून डेंग्यू डासांची निर्मिती झाली आहे. महापालिकेच्या वतीने डास निर्मूलनासाठी फवारणी आणि धुराळणीचे काम सुरू असल्याचा दावा असला तरी या कामात अनियमितता आहे. प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतरच यासंदर्भात कार्यवाही होते, अशी तक्रार आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य