पंचवटी : संपूर्ण देशभरात विशेषत: गुजरात आणि महाराष्ट्रात अनेक जागांवर शिवसेना-भाजपा युतीचे खासदार निवडून आल्याने व त्यातच मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार असल्याने पंचवटी परिसरातील गुजराथी बांधवांनी जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला. ‘फिर एक बार आपडी सरकार’ असे म्हणत गुजराथी समाजातील बांधवांनी नमो नमोचा नारा लगावला.पंचवटी परिसरात गुजराथीबांधव आहेत. मोदी सरकार आल्याने गुजराथी समाज खूश झाला आहे. मोदी सरकार आल्याने मोदींना मानणाऱ्या वर्गाची संख्या अजून वाढेल. मोदी सरकार येणार हे जाहीर होताच अनेक महिलांनी आपल्या गुजरात, अहमदाबाद येथील नातेवाइकांना फोन करत बधाई हो अशा शुभेच्छा दिल्या.मोदींनी देशात चांगले काम केल्याने पुन्हा मोदी सरकार येणार याची शाश्वती होती याशिवाय या निवडणुकीत भाजपाच्या जागा वाढतील हे स्पष्ट होते.एकीकडे आनंद दुसरीकडे निराशाएकीकडे भाजपा-शिवसेना युतीचे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत होते, तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते निराश झाले होते. दुपारी १ वाजेनंतर भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा वसंतस्मृती कार्यालयाकडे धाव घेतली होती. निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचल्याने अनेकांनी सोशल मीडियावर संदेश प्रसारित करून ‘बार बार भाजपा’ सरकारचा नारा दिला. युतीच्या उमेदवाराने मतांची आघाडी घेतल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांच्या चेहºयावर आनंदाचे वातावरण पसरले होते.
‘फिर एक बार आपडी मोदी आया’चा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:23 IST