शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
4
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
5
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
6
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
7
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
8
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
9
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
10
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
11
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
12
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
13
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
15
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
16
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
17
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
18
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
19
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
20
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन

हरिश्चंद्रगडाच्या वाटेवर चमकणारा बाळू रेंगडे नावाचा ‘तारा’ निखळला

By अझहर शेख | Updated: March 6, 2024 16:42 IST

सह्याद्रीवर जीवापाड प्रेम करणारा अन् गिरीभ्रमंतीसाठी त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ट्रेकर्सला अतिथी देवो भव: या उक्तीप्रमाणे नि:स्वार्थपणे सेवा देणारा उत्तम माहितगार संकटमोचक गाइड बाळू रेंगडे याला काळाने हिरावून नेले.

नाशिक : सह्याद्रीवर जीवापाड प्रेम करणारा अन् गिरीभ्रमंतीसाठी त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक ट्रेकर्सला अतिथी देवो भव: या उक्तीप्रमाणे नि:स्वार्थपणे सेवा देणारा उत्तम माहितगार संकटमोचक गाइड बाळू रेंगडे याला काळाने हिरावून नेले. खिरेश्वरचा बाळू हा हरिश्चंद्रगडाच्या वाटेवर चमकणारा तारा होता, अशी भावना नाशिक, पुण्यातील ट्रेकर्स मंडळीसह वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

अहमदनगर, पुणे, ठाणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर उभा असलेल्या हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी विविध वाटा आहेत; मात्र खिरेश्वर मार्ग आणि कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील पाचनई गावातून जाणारा मार्ग ट्रेकर्सच्या पसंतीचा आहे. बाळू हा खिरेश्वरमार्गे पर्यटकांना गडभ्रमंती घडवून आणायचा. त्याच्याकडे असलेल्या इत्यंभूत माहितीचा खजिनाही तो रिता करत गडासह परिसरातील अन्य डोंगर, गड, धबधबे, जंगल, देवराया, जैवविविधतेबाबत इत्यंभूत माहिती दंतकथा तो सांगत असे. निर्व्यसनी बाळूला दुर्धर आजाराने वर्षभरापूर्वी ग्रासले. यामुळे त्याचा मंगळवारी (दि.५) अकाली मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, वृद्ध आई, वडील, भाऊ, भावजयी असा परिवार आहे.

त्या पाच मित्रांसाठी बाळू ठरला होता ‘देवदूत’ 

मागीलवर्षी ऑगस्टमध्ये पावसाळ्यात गडावर पुण्याच्या हौशी ट्रेकर्सच्या सहाजणांचा एक ग्रुप वाट चुकला होता. दाट धुके, धो-धो कोसळणारा पाऊस अन् झालेल्या अंधारामुळे त्यांना गडावरून खाली उतरता आले नव्हते अन् ते भरकटले होते. थंडी आणि उपासमारीमुळे एकाचा मृत्यूही झाला होता. बाळू रेंगडे याला दुसऱ्या दिवशी जेव्हा माहिती मिळाली, तेव्हा बाळूने कसलीही तमा न बाळगता त्या भरकटलेल्या लोकांच्या शोधासाठी गड चढायला सुरुवात केली. एका मृतदेहाजवळ पाच लोक बसलेले त्याला दिसले. त्यांच्यात एक शाळकरी मुलगाही होता. गावकरी, वन्यजीव विभागाला त्याने माहिती दिली. आपत्कालीन मदत मागविली. भरपावसात जुन्नर रेस्क्यू टीम, वन्यजीव विभाग, पोलिस, स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने बाळूने सलग दोन दिवस रेस्क्यू ऑपरेशन राबवून पाचजणांचे प्राण वाचविले होते. त्यांच्यासाठी तो संकटमोचक ठरला. होता. वन्यजीव विभागाचे तत्कालीन सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, राजूर वनक्षेत्रपाल दत्तात्रय पडवळे यांनी बाळूच्या धाडसाचे कौतुक करत त्याला रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले होते.

बाळूची उणीव नेहमीच भासणार आहे. त्याच्या अकाली निधनाने वन-वन्यजीव विभागाने मोठा दुवा गमावला आहे. कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य राजूर वनपरिक्षेत्र व नाशिक वन्यजीव विभाग त्याच्या कुटुंबीयांच्या नेहमीच पाठीशी आहे.दत्तात्रय पडवळे,प्रभारी सहायक वनसंरक्षकहरिश्चंद्रगडासह सर्वच आजूबाजूच्या गडांची इत्यंभूत माहिती ठेवणारा उत्तम संवादकौशल्य अवगत असलेला तो गाइड होता. वन्यजीव विभागाला बाळूची नेहमीच साथ लाभली. तो वन्यजीव विभागासह पर्यटकांचा विश्वासाचा हक्काचा माणूस होता.गणेश रणदिवे,विभागीय वनाधिकारी, नाशिकबाळू रेंगडे हा उत्तम अभ्यासू गाइड तर होताच मात्र माझ्या लहान भावासारखा होता. त्याच्यामुळेच मला सह्याद्रीला जवळून ओळखता आले. प्रचंड स्वाभिमानी, निस्वार्थी बाळू आयुष्यभर सह्याद्री आणि तेथे येणाऱ्या पर्यटकांवर जीवापाड प्रेम करत राहिला. अखेरचा श्वास घेतानाही त्याने ते प्रेम ‘मला कोकणकड्याला डोळे मिटण्याअगोदर घट्ट मिठी मारायची आहे,’ अशा शब्दांतून व्यक्त केले.ओंकार ओक,ट्रेकर्स, रेस्क्यू समन्वयक, पुणेबाळू हा हरहुन्नरी वाटाड्या. कधीही आणि कुठेही सहज उपलब्ध होणारा. येणाऱ्या कोणत्याही ट्रेकर्सशी मैत्री करणारा होता. हरिश्चंद्रगड हा त्याचा ‘वीक पॉइंट’ होता. या परिसरात कुठेही दुर्घटना घडली तर बाळू असेल तेथून धावत यायचा. कुठलीही अपेक्षा न ठेवता. तो पहिला मदतीचा हात पुढे करायचा. त्याच्या निधनाने सह्याद्रीची मोठी हानी झाली आहे.संजय अमृतकर,गिर्यारोहक, नाशिक

टॅग्स :Nashikनाशिक