शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

देवळ्यात चार सोसायट्यांसाठी अखेरच्या दिवशी १४५ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 22:53 IST

देवळा : तालुक्यातील वाजगाव, खुंटेवाडी, वाखारवाडी व डोंगरगाव ह्या चार विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी १४५ अर्ज दाखल झाले असून, वाजगाव सोसायटीसाठी सर्वाधिक ५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात वाखारवाडी ३३, खुंटेवाडी ३२, डोंगरगाव २९ अर्जांचा समावेश आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी या गावांमध्ये प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देथकबाकीदार सभासद मतदानापासून वंचित राहणार

देवळा : तालुक्यातील वाजगाव, खुंटेवाडी, वाखारवाडी व डोंगरगाव ह्या चार विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी १४५ अर्ज दाखल झाले असून, वाजगाव सोसायटीसाठी सर्वाधिक ५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात वाखारवाडी ३३, खुंटेवाडी ३२, डोंगरगाव २९ अर्जांचा समावेश आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी या गावांमध्ये प्रयत्न सुरू आहेत.दि. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी झाल्यानंतर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थिक गर्तेत सापडली होती. यामुळे तालुक्याच्या प्रत्येक गावाचा आर्थिक कणा असणाऱ्या विविध कार्यकारी सोसायट्या डबघाईस आल्या. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणाऱ्या या सोसायट्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली, त्यातच कोरोनामुळे वसुली ठप्प झाल्यामुळे त्या अधिकच डबघाईस गेल्या. यास वेळेवर कर्ज फेड न करणारे कर्जदार जेवढे जबाबदार आहेत तेवढीच जिल्हा बँक व सोसायटी प्रशासन यांनी कर्जवाटपात केलेली अनियमितता, संस्थेचे लेखापरीक्षण करणाऱ्या लेखापरीक्षकांनी केलेले दुर्लक्षदेखील तेवढेच जबाबदार आहे.यामुळे नियमित कर्ज फेड करणाऱ्या सभासदांमध्येदेखील नाराजीचा सूर आहे. ह्या निवडणुकीत थकबाकीदार सभासद मतदानापासून वंचित राहणार असल्यामुळे प्रत्येक सोसायटीत मतदारांची संख्या घटली आहे. सहकार पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी गावातील गटतट, भाऊबंदकी व राजकीय मतभेद दूर ठेवत सोसायटीच्या संचालकपदी अभ्यासू व योग्य व्यक्तींना संधी मिळाली पाहिजे, अशी चर्चा सोसायटी सभासदांमध्ये सुरू झाली आहे.सोमवारी (दि. २८) नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. २९ मार्च ते १२ एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत असून, दि. १३ एप्रिल रोजी अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक चिन्हांसह प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ ह्या वेळेत मतदान होणार असून, मतदानानंतर अर्ध्या तासाने मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूकtalukaतालुका