शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात आढळला ओमायक्रॉनचा रुग्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 01:40 IST

अवतीभोवतीच्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच दाखल झालेला ओमायक्रॉन गुरुवारी (दि. ३०) नाशकातही दाखल झाला आहे. गंगापूर रोड परिसरातील एक दहा वर्षांचा मुलगा ओमायक्रॉनने बाधित आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र, या बालकात कोणतीही लक्षणे आढळून आली नसून, त्याची प्रकृती स्थिर आहे.

ठळक मुद्देगंगापूर रोड परिसरातील दहावर्षीय मुलगा बाधित

नाशिक : अवतीभोवतीच्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच दाखल झालेला ओमायक्रॉन गुरुवारी (दि. ३०) नाशकातही दाखल झाला आहे. गंगापूर रोड परिसरातील एक दहा वर्षांचा मुलगा ओमायक्रॉनने बाधित आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र, या बालकात कोणतीही लक्षणे आढळून आली नसून, त्याची प्रकृती स्थिर आहे.

मुंबईसह पुणे, ठाणे, औरंगाबाद, नगर या नाशिकलगतच्या जिल्ह्यांमध्ये ओमायक्राॅनचे रुग्ण यापूर्वीच आढळले होते. मात्र, नाशिककर आतापर्यंत त्यापासून लांब होते. बुधवारी सायंकाळी संबंधित बालकाचा अहवाल ओमायक्रॉन बाधित असल्याचे आढळल्याने मनपा आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासकीय स्तरासह आरोग्य यंत्रणांकडूनही विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील काही संशयित रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यातील हा नमुना बाधित आढळून आला आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता हा विषाणू पसरू नये, यासाठी कोरोना नियमांचे पालन करण्याची गरज आहे. स्वतःचे लसीकरण करून घेणे हे यावरील सर्वाधिक महत्त्वाचे सुरक्षाकवच असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

इन्फो

आई-वडील बाधित मात्र प्रकृती स्थिर

१८ डिसेंबरला सर्वप्रथम या बालकाचे आई-वडील कोरोनाबाधित झाल्याचे आढळले. त्यानंतर १९ तारखेला या बालकाचीही चाचणी केल्यानंतर तो बाधित आढळून आला. दरम्यान, संबंधित खासगी लॅबने त्या बालकाचे नमुने रॅन्डम तपासणी म्हणून जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले. त्याचा अहवाल प्राप्त होण्यास १२ दिवसांचा कालावधी लागला असून, हा बालक ओमायक्रॉनग्रस्त असल्याचे त्या तपासणीत आढळले आहे. दरम्यान, आता या बालकाच्या माता-पित्याचे तसेच त्याच्याशी संबंधित रुग्णांचे नमुनेदेखील जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात येणार असल्याचे महापालिका वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.

इन्फो

यंत्रणा अलर्टवर

गत दहा दिवसात हे तिन्ही रुग्ण घरीच विलगीकरणात राहून उपचार घेत होते. मात्र, बालकाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बालक हा असिम्प्टॅमॅटिक असून, प्रकृतीदेखील स्थिर असल्याचा आरोग्य विभागाला दिलासा आहे. मात्र, पहिलाच कोरोना रुग्ण आढळला असल्याने जिल्ह्यातील आणि मनपा क्षेत्रातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून, अधिकाधिक दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकOmicron Variantओमायक्रॉन