शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

ओमकारानंद यांच्या योगासनांनी वेधले लक्ष

By admin | Updated: September 14, 2015 23:50 IST

साधना : गांधी तलावावर भाविकांची गर्दी

नाशिक : वेळ संध्याकाळी सहा वाजेची. ठिकाण गांधी तलाव. गुजरातमधील बडोदा येथून कुंभनगरीत दाखल झालेले स्वामी ओमकारानंद सरस्वती महाराजांनी महापर्वणीच्या दुसऱ्या दिवशी गोदाघाटावरील गांधीतलावावर स्नानासाठी पोहचले. यावेळी या साधूमहाराजांनी स्नानापश्चात विविध योगासने करून उपस्थित भाविकांचे लक्ष वेधले.महापर्वणी पार पडल्यानंतरही दुसऱ्या दिवशी संपूर्ण रामकुंड परिसरासह साधुग्राम गजबजलेले होते. भाविकांची वर्दळ कायम असल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान, सूर्य मावळतीला असताना या साधूमहाराजांनी गांधी तलावात डुबकी मारली. स्नान आटोपल्यानंतर तत्काळ नदीकाठी आपले भगवे वस्त्र अंथरून योगसाधनेला प्रारंभ केला. यावेळी त्यांनी कुक्कुटासन, ध्रुवासन, सूर्यासन यासारखे योगांचे विविध प्रकार करून आपल्या योगसाधनेने संपूर्ण गांधी तलाव, रामकुंड परिसरातील भाविकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांची साधना बघण्यासाठी दशक्रिया विधी छत्रीपासून संपूर्ण रामकुंडाजवळील गंगागोदावरी मंदिराचा लहान पूल या भागात भाविक मोठ्या संख्येने त्यांची योगसाधना बघण्यासाठी जमा झाले होते. अनेकांनी त्यांच्या साधनेच्या छबी मोबाइलमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला. सुमारे पंधरा मिनिटे चाललेल्या साधूमहाराजांच्या योगसाधनेने भाविकांना आश्चर्यचकित केले. (प्रतिनिधी)

गंगा-गोदावरीच्या पात्रात कुंभपर्वणी काळात स्नान केल्यानंतर गंगानदीच्या काठावर साठ वर्षे तपश्‍चर्या केल्याचे पुण्य लाभते. कुंभपर्वणीचे अनन्यसाधारण महत्त्व असून, त्र्यंबकेश्‍वर येथे गोदावरीपात्रात शाहीस्नान केले. त्यानंतर आज नाशिकच्या रामकुंड परिसरात गोदापात्रात स्नान केले. भाविकांचा दोन्ही ठिकाणी लोटलेला जनसागर बघून अभुतपूर्व कुंभपर्वणी साजरी झाली.- ओमकारानंद सरस्वती