शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

गोदामाईची भरली ओटी !

By admin | Updated: July 16, 2016 00:03 IST

धरणात वाढला पाणीसाठा : महापौरांच्या हस्ते जलपूजन

 नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातच ६६ टक्क्यांवर जाऊन पोहोचल्याने माहेरवाशीण बनून आलेल्या गोदामाईची महापालिकेच्या वतीने विधीवत साडीचोळी देऊन ओटी भरण्यात आली. याचवेळी महापौर अशोक मुर्तडक यांनी जलपूजन करत गोदामाईने अखंड कृपादृष्टी राहू द्यावी, अशी प्रार्थना केली. संपूर्ण शहराची पाण्याची गरज भागविणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा १५ टक्क्यांवर येऊन पोहोचला असताना वरुणराजा हुलकावणी देत असल्याने नाशिककरांच्या चिंता वाढल्या होत्या. मात्र, गेल्या रविवारी (दि.१०) शहराला जोरदार पावसाने सलामी दिली आणि दोन दिवसातच धरणातील पाणीसाठा ४७ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. दि. १५ जुलैअखेर धरणातील पाणीसाठा ६६.१२ टक्के इतका झालेला आहे. धरणातील पाणीसाठ्यात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झाल्याने महापालिकेने दर गुरुवारी होणारी पाणीकपात रद्द केली आणि पूर्वीप्रमाणेच दोन वेळ पाणीपुरवठ्याबाबतचा निर्णय येत्या २० जुलैला होणाऱ्या महासभेत घेतला जाणार आहे. दरम्यान, वरुणराजा भरूभरून बरसल्याने गोदामाई दुथडी भरून वाहिली. गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे गोदामाईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आषाढी एकादशीचा सुमुहूर्त साधत गोदामाईची विधीवत ओटी भरण्यात आली. सिडकोतील मनसेच्या नगरसेवक कांचन पाटील व नामदेव पाटील या दाम्पत्याने साडी-चोळी-बांगड्या देऊन गोदामाईची ओटी भरली, तर महापौर अशोक मुर्तडक यांनी श्रीफळ अर्पण करत जलपूजन केले. विधीचे पौराहित्य पंकज देवळे यांनी केले. यावेळी उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख, मनसेचे गटनेते अनिल मटाले, पश्चिम प्रभाग सभापती शिवाजी गांगुर्डे, माकपचे गटनेते तानाजी जायभावे, नगरसेवक लक्ष्मण जायभावे, राजेंद्र महाले, उद्धव निमसे तसेच अधीक्षक अभियंता उत्तम पवार, कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, पी. एम. गायकवाड, धनाईत, उदय धर्माधिकारी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)