शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

स्मार्ट पार्किंग प्रायोगिक तत्त्वावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:55 IST

दुकांनासमोर वाहन उभे करणाऱ्या नागरिकांकडून शुल्क वसूल करण्यासाठी तब्बल २८ रहदारीचे मार्ग निवडण्यात आले असून, त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत.

नाशिक : दुकांनासमोर वाहन उभे करणाऱ्या नागरिकांकडून शुल्क वसूल करण्यासाठी तब्बल २८ रहदारीचे मार्ग निवडण्यात आले असून, त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. तथापि, अशाप्रकारची स्मार्ट पार्किंग प्रायोगिक तत्त्वावर असून, त्यातून अडचणी लक्षात आल्यानंतर त्या दूर करण्यात येतील अशी ग्वाही महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे. त्याचबरोबर दुकानात किरकोळ खरेदीसाठी येणाºया नागरिकांना भुर्दंड सोसावा लागू नये यासाठी त्यांना कशी सूट देता येईल याबाबत अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.शहरातील वाहनतळाचा प्रश्न सोडविण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने २८ ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहनतळ सुरू केले असून वाहनतळ सशुल्क असल्याने लवकरच त्याठिकाणी नागरिकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे. मुळात रस्त्यावर वाहनतळाची महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण नियमावलीत तरतूद नाही. त्यातच महापालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी नाही की महापालिकेच्या स्थायी समितीने कर आणि दर न ठरविताच स्मार्ट सिटी कंपनीने महापालिकेच्या मिळकतींवर आक्रमण केले असून, त्यासंदर्भात नगरसेवकदेखील अंधारात आहेत. ‘लोकमत’ने या विषयाला वाचा फोडली. यातील कायदेशीर मुद्दे अनेक असले तरी मुळातच शहरातील बाजारपेठ आणि व्यापारी संकुलासमोरील रस्त्यावर पे अ‍ॅण्ड पार्क सुरू करून नागरिकांंबरोबरच त्या दुकानदारांचीदेखील कोंडी करण्यात आली आहे. किरकोळ खरेदीसाठी कोणत्याही दुकानात जाताना वाहन उभे करायचे म्हणून दहा ते पंधरा रुपये शुल्क भरावे लागत असेल तर ग्राहक त्या दुकानांकडे पाठ फिरवतील.स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे हे गुरुवारी (दि.१८) नाशिकमध्ये बैठकीसाठी आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात आयुक्तराधाकृष्ण गमे यांना दखल घेऊन सुधारणा करण्यास सांगितले होते. त्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.२३) पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सदरची पार्किंग प्रायोगिक तत्त्वावर असून, त्यात येणाºया अडचणी लक्षात घेऊन त्या दूर करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, एखाद्या दुकानात खरेदीसाठी अल्पकाळ ग्राहक गेल्यास त्याला आर्थिक भुर्दंड बसू नये यासाठी अल्पकाळ वाहन लावल्यास काही सवलत देता येईल काय याबाबत अभ्यास करून तोडगा काढण्यात येणार आहे, असे गमे यांनी सांगितले.रस्त्याची जागा दुकानदारांची नाही !शहरातील व्यापारी संकुलांसमोर स्मार्ट पार्किंग सुरू करून शुल्क वसूल करण्यावरून दुकानदारांची ओरड सुरू असली तरी मुळात रस्त्याची जागा महापालिकेच्या मालकीची असून, दुकानदारांची नाही, असे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. तथापि, दुकानांच्या सामासिक अंतराच्या पुुढे स्मार्ट पार्किंग केल्याने ग्राहक त्या दुकानदाराकडे कसे काय जाऊ शकतील हा प्रश्न कायम आहे. त्यातच व्यापारी संकुलातील दुकानदारांना त्यांच्या दुकानासमोर गाडी उभी करताना भुर्दंड मोजावा लागेल त्याचे काय त्याबाबत मात्र आयुक्तांनी खुलासा केलेला नाही.ठेकेदारच्याकर्मचाºयाची मुजोरी, ज्येष्ठ नगरसेविकेलाच अडविले..स्मार्ट पार्किंगची वसुली अद्याप सुरू झालेली नाही. मात्र, वसुली कर्मचारी तैनात झालेले आहेत. कॉँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील या कॅनडा कॉर्नर येथील पाटील प्लाझासमोर माध्यम प्रतिनिधींना मुलाखत देत असताना एका वसुली कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकले आणि स्मार्ट पार्किंगवर काही बोलायचे असेल तर आधी आमच्या साहेबांशी बोला, असे बजावले. याप्रकारामुळे पाटील यांनी संताप व्यक्त केला असून, ठेकेदारच्या कर्मचाºयांना असले अधिकार दिले कोणी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Parkingपार्किंगSmart Cityस्मार्ट सिटी