शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

खांदेपालट होताच जुन्या सैनिकांनी चढली पायरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:20 IST

शिवसेनेच्या नाशिक महानगरप्रमुखपदी सचिन मराठे व महेश बडवे या दोघांच्या पदग्रहण सोहळ्याला आजी, माजी जिल्हा प्रमुखांसह जुन्या शिवसैनिकांनी लावलेली हजेरी व दोघा महानगरप्रमुखांच्या स्वागतासाठी जमलेल्या हजारो सैनिकांमुळे शिवसेनेत जल्लोष निर्माण झाला असून, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच सेना भवनसमोर फटाक्याच्या आतषबाजीत व ढोल-ताशांच्या गजरात नवनियुक्तांचे स्वागत करण्यात आले आहे.

नाशिक : शिवसेनेच्या नाशिक महानगरप्रमुखपदी सचिन मराठे व महेश बडवे या दोघांच्या पदग्रहण सोहळ्याला आजी, माजी जिल्हा प्रमुखांसह जुन्या शिवसैनिकांनी लावलेली हजेरी व दोघा महानगरप्रमुखांच्या स्वागतासाठी जमलेल्या हजारो सैनिकांमुळे शिवसेनेत जल्लोष निर्माण झाला असून, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच सेना भवनसमोर फटाक्याच्या आतषबाजीत व ढोल-ताशांच्या गजरात नवनियुक्तांचे स्वागत करण्यात आले आहे. एरव्ही शिवसेनेच्या स्थानिक पातळीवर खांदेपालट झाल्यानंतर पदावरून गच्छंती झालेल्या पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण होणारी नाराजी व त्यातून गटबाजीमुळे नवनियुक्त पदाधिकाऱ्याला पदभार स्वीकारल्याच्या पहिल्या दिवसापासूनच गटबाजीचा सामना तसेच राजी-नाराजी घालविण्याचे प्रयत्न करावे लागत. शिवाय नवनियुक्त पदाधिकारी कोणाच्या गटाचा यावरच त्याला समर्थन वा सहकार्य करण्याची भूमिका ज्येष्ठ आजी, माजी पदाधिकाºयांकडून केली जात होती. परंतु आजवरच्या या सर्व गोष्टीला सोमवारी फाटा देण्यात आला. पक्षाने मूळ शिवसैनिक असलेल्या सचिन मराठे यांची महानगरप्रमुख म्हणून नियुक्ती केल्याने त्यांच्या स्वागतासाठी पहिल्यांदाच दत्ता गायकवाड, विनायक पांडे व जयंत दिंडे या तीन माजी जिल्हा प्रमुखांनी आवर्जून हजेरी लावली. त्याचबरोबर एकेकाळी सुनील बागुल यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाºया मंगला भास्कर, प्रेमलता जुन्नरे, कोकिळा वाघ या जुन्या महिला सैनिकांची उपस्थिती बरेच काही सांगून गेले. काळानुरूप स्थानिक सेनेत झालेल्या उलथापालथीमुळे पदाधिकाºयांपासून दुरावलेले परंतु मनाने सेनेतच असलेल्या जुन्या शिवसैनिकांनीदेखील या सोहळ्यास हजरी लावल्याने शिवसेनेचे कार्यालय बºयाच कालावधीनंतर गर्दीने खच्चून भरले होते. सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी नवीन महानगरप्रमुखांच्या पदग्रहणाला उपस्थित राहण्याची ही देखील पहिलीच वेळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना